Lokmat Money > बिझनेस न्यूज > अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाला आणखी एक धक्का! दिल्ली-वॉशिंग्टनला जाणारे विमान वाटेतच रद्द

अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाला आणखी एक धक्का! दिल्ली-वॉशिंग्टनला जाणारे विमान वाटेतच रद्द

Air India Flight cancelled : एअर इंडियाचे दिल्लीहून वॉशिंग्टनला जाणारे विमान वाटेतच रद्द करण्याची वेळ आली आहे. यापूर्वीही दोनतीन वेळा कंपनीने आपले उड्डाण रद्द केल्याच्या घटना घडल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 15:13 IST2025-07-03T14:38:12+5:302025-07-03T15:13:04+5:30

Air India Flight cancelled : एअर इंडियाचे दिल्लीहून वॉशिंग्टनला जाणारे विमान वाटेतच रद्द करण्याची वेळ आली आहे. यापूर्वीही दोनतीन वेळा कंपनीने आपले उड्डाण रद्द केल्याच्या घटना घडल्या आहेत.

air india delhi washington flight cancelled check the reason here | अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाला आणखी एक धक्का! दिल्ली-वॉशिंग्टनला जाणारे विमान वाटेतच रद्द

अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाला आणखी एक धक्का! दिल्ली-वॉशिंग्टनला जाणारे विमान वाटेतच रद्द

Air India Flight cancelled : अहमदाबाद विमान अपघातानंतरएअर इंडिया कंपनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी खूप काळजीपूर्वक पाऊल टाकत आहे. याचाच एक भाग म्हणून काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मात्र, ताज्या घटनेत प्रवाशांना मोठा त्रास झाला आहे. टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडियाची दिल्लीहून वॉशिंग्टनला जाणारी एक फ्लाइट रद्द करण्यात आली आहे. याचे कारणही आता समोर आलं आहे.

खरं तर, नवी दिल्लीहून वॉशिंग्टनला जाणारे एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक AI103 ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे इंधन भरण्यासाठी थांबले होते. मात्र, इथून ते पुढे वॉशिंग्टनला जाऊ शकले नाही. Flightradar24 डेटावरून असे दिसून येते की हे विमान २ जुलै रोजी दिल्लीहून निघाले आणि व्हिएन्नामध्ये उतरले, पण तेथून वॉशिंग्टनला पुढे गेले नाही.

एअर इंडियाचे काय म्हणणे आहे?
एअर इंडियाने या घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, विमान व्हिएन्नामध्ये थांबवण्याचे नियोजन होतेच. पण, नियमित तपासणी करत असताना देखभालीचे काही मोठे काम निघाले, ज्यामुळे विमान जास्त काळ व्हिएन्नामध्येच थांबले. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, याच कारणामुळे व्हिएन्ना ते वॉशिंग्टन डीसीला जाणारे विमान रद्द करावे लागले आणि प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले.

प्रवक्त्यांनी हेही स्पष्ट केले की, वॉशिंग्टन डीसी ते व्हिएन्ना मार्गे दिल्लीला येणारी उलट फ्लाइट AI104 देखील रद्द करण्यात आली आहे. या दोन्ही फ्लाइटमधील प्रवाशांना कंपनीने पर्यायी विमानांची सुविधा दिली, किंवा ज्यांना परत जायचे होते त्यांना तिकिटाचे पूर्ण पैसे परत देण्यात आले.

प्रवाशांना दिल्लीला परत पाठवले
बुधवारी दुपारी १२.४५ वाजता दिल्लीहून निघालेले आणि गुरुवारी रात्री ८.४५ वाजता वॉशिंग्टनला पोहोचणारे फ्लाइट AI103 व्हिएन्ना येथे रद्द झाल्यामुळे, सर्व प्रवाशांना पर्यायी विमानांनी दिल्लीला परत पाठवण्यात आले.

एअर इंडियाला अलीकडे बसलेले धक्के
अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडिया सतत चर्चेत आहे.

  • टोकियो ते दिल्ली विमान कोलकात्याला वळवले : पीटीआयच्या वृत्तानुसार, केबिनमध्ये सतत जास्त तापमान असल्याने टोकियोच्या हानेडा विमानतळावरून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान गेल्या रविवारी कोलकात्याला वळवण्यात आले. एअर इंडियाने मात्र विमान सुरक्षित उतरल्याचे म्हटले आहे.
  • चेन्नईला जाणारे विमान मुंबईला परत : यापूर्वी, केबिनमध्ये जळण्याचा वास आल्यामुळे शनिवारी चेन्नईला जाणारे एअर इंडियाचे विमान मुंबईला परत आणावे लागले होते.

वाचा - ITR भरताना सावधान! यंदा नियम खूप कडक, 'या' चुका केल्यास थेट तुरुंगात जावं लागेल

या घटनांमुळे एअर इंडियावर सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: air india delhi washington flight cancelled check the reason here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.