lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Air India: एअर इंडियाला गवसला हिंदुकुश पर्वतामधील ‘शाॅर्टकट’

Air India: एअर इंडियाला गवसला हिंदुकुश पर्वतामधील ‘शाॅर्टकट’

Air India: एअर इंडियाला हिंदुकुश पर्वतरांगांमधून जाणारा प्राचीन सिल्क रोड नव्याने गवसला. त्यामुळे वेळासह लाखाे लिटर इंधनाचीही बचत शक्य झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 08:38 AM2021-10-11T08:38:15+5:302021-10-11T08:38:40+5:30

Air India: एअर इंडियाला हिंदुकुश पर्वतरांगांमधून जाणारा प्राचीन सिल्क रोड नव्याने गवसला. त्यामुळे वेळासह लाखाे लिटर इंधनाचीही बचत शक्य झाली आहे.

Air India: Air India finds 'shortcut' in Hindu Kush mountains | Air India: एअर इंडियाला गवसला हिंदुकुश पर्वतामधील ‘शाॅर्टकट’

Air India: एअर इंडियाला गवसला हिंदुकुश पर्वतामधील ‘शाॅर्टकट’

नवी दिल्ली : तालिबानने अफगाणिस्तानच्या हवाई सीमा बंद केल्यानंतर युराेप आणि अमेरिकेकडे जाणाऱ्या विमानांचा प्रवास काही तासांनी वाढला हाेता. मात्र, एअर इंडियाला हिंदुकुश पर्वतरांगांमधून जाणारा प्राचीन सिल्क रोड नव्याने गवसला. त्यामुळे वेळासह लाखाे लिटर इंधनाचीही बचत शक्य झाली आहे.
तालिबानने अफगाणिस्तानची हवाई सीमा बंद केली आहे. परिणामी एअर इंडियाच्या विमानांना दक्षिण पाकिस्तानातून इराण आणि तुर्कमेनिस्तानमार्गे युराेपमध्ये न्यावे लागत आहे. यामुळे एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमानाचा प्रवास लांबला. दिल्ली-लंडन विमान प्रवास ९.५ तासांचा झाला. त्यामुळे पर्यायाबाबत विचार सुरू झाला. अशावेळी प्राचीन काळी वापरण्यात येणाऱ्या ‘सिल्क राेड’चा पर्याय समाेर आला. हिंदुकुश पर्वतरांगांमधून व्यापारासाठी सिल्क रोडचा वापर व्हायचा. याच पर्वतरांगांवरून नवा मार्ग शाेधल्याने हाच प्रवास ८.५ तासांमध्ये पूर्ण हाेत आहे. 

- प्राचीनकाळी भारत आणि चीनमधून युराेपमध्ये हाेणाऱ्या वापारासाठी ‘सिल्क राेड’चा वापर व्हायचा. अलेक्झांडरदेखील याच मार्गाने आला होता.
- एअर इंडियाच्या ४ ऑक्टाेबरला लंडनला गेलेल्या विमानाने ९.३७ तासांमध्ये प्रवास पूर्ण केला. नव्या मार्गावरून ७ ऑक्टाेबरला गेलेल्या विमानाने ८.४१ तास घेतले.
- नव्या मार्गामुळे उत्तर अमेरिकेच्या एका फेरीत ४ टन इंधन, तर लंडनच्या फेरीमध्ये २.५ टन इंधनाची बचत हाेत हाेणार आहे. कमी इंधन न्यावे लागत असल्याने अतिरिक्त कार्गाे नेणे शक्य आहे. 
-  हिंदुकुश पर्वतरांगांवरील मार्ग ताझिकिस्तान, कझाकिस्तान आणि युक्रेनमधून युराेप आणि लंडन असा आहे. 

Web Title: Air India: Air India finds 'shortcut' in Hindu Kush mountains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.