lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मायक्रोसॉफ्टवर AI ची कृपा, रचला इतिहास; कंपनीचं मार्केट कॅप पोहोचलं ३ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे

मायक्रोसॉफ्टवर AI ची कृपा, रचला इतिहास; कंपनीचं मार्केट कॅप पोहोचलं ३ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे

AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आयटी कंपनी मायक्रोसॉफ्टनं (Microsoft) नवा विक्रम रचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 11:15 AM2024-01-25T11:15:44+5:302024-01-25T11:16:02+5:30

AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आयटी कंपनी मायक्रोसॉफ्टनं (Microsoft) नवा विक्रम रचला आहे.

AI benefits Microsoft creates history The company s market cap has reached over 3 trillion dollars apple huge market cap | मायक्रोसॉफ्टवर AI ची कृपा, रचला इतिहास; कंपनीचं मार्केट कॅप पोहोचलं ३ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे

मायक्रोसॉफ्टवर AI ची कृपा, रचला इतिहास; कंपनीचं मार्केट कॅप पोहोचलं ३ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे

AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आयटी कंपनी मायक्रोसॉफ्टनं (Microsoft) नवा विक्रम रचला आहे. या जगातील आघाडीच्या आयटी कंपनीनं प्रथमच ३ ट्रिलियन डॉलर्सच्या मार्केट कॅपचा टप्पा ओलांडला आहे. मार्केट कॅपच्या बाबतीत Apple ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. मात्र, मायक्रोसॉफ्टने इंट्रा-डेमध्ये काही काळ अॅपलला मागे टाकलं होतं. मात्र प्रॉफिट बुकींगमुळे सॉफ्टवेअर कंपनी पुन्हा एकदा दुसऱ्या क्रमांकावर आली. दरम्यान, फेसबुकची मूळ कंपनी मेटाचं बाजार भांडवलही वाढलं आहे. मार्क झुकरबर्गच्या या कंपनीचं बाजार भांडवल १ ट्रिलियन डॉलर्सच्या वर गेले आहे. 

मायक्रोसॉफ्टबद्दल बोलायचं झालं तर २०२३ मध्ये गेल्या वर्षी सर्वाधिक परतावा देणाऱ्या कंपन्यांपैकी ती एक होती. गेल्या वर्षी कंपनीनं ५७ टक्क्यांचा परतावा दिला होता. कंपनीनं यावर्षी ७.४ टक्के परतावा दिला आहे. Nasdaq 100 निर्देशांकानं याच कालावधीत ४.६ टक्के परतावा दिलाय. त्याच वेळी, S&P 500 इंडेक्समध्ये मायक्रोसॉफ्टचा हिस्सा ७.३ टक्के आहे.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

मायक्रोसॉफ्टच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कंपनीनं AI शी संबंधित करार केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढलाय. रिपोर्टनुसार, एआय मार्केटमधील अधिक संधींचा फायदा घेण्यासाठी मायक्रोसॉफ्ट स्वस्त आणि छोट्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल्सवर काम करत आहे. कंपनी नवीन जनरेटिव्ह एआय टीम स्मॉलर लँग्वेज मॉडेल्स (SLMs) विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करेल जे OpenAI च्या GPT-4 सारख्या एसएलएम सारखं आहे, परंतु कमी कम्प्युटिंग पावरचा उपयोग करते. कंपनीनं कन्व्हर्सेशनल AI विकसित करण्यासाठी नवीन टीम तयार केली आहे, ज्यासाठी OpenAI च्या सॉफ्टवेअरपेक्षा कमी कम्प्युटिंग पॉवरची आवश्यकता असते.

Web Title: AI benefits Microsoft creates history The company s market cap has reached over 3 trillion dollars apple huge market cap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.