Lokmat Money > बिझनेस न्यूज > पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

Pakistan stock market: भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर पाकिस्तानच्या शेअर बाजारात खळबळ उडाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 11:29 IST2025-05-07T11:28:26+5:302025-05-07T11:29:36+5:30

Pakistan stock market: भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर पाकिस्तानच्या शेअर बाजारात खळबळ उडाली आहे.

after operation sindoor What is the condition of the Pakistani stock market share market crash during the day | पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

Pakistan stock market: भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर पाकिस्तानच्या शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या बातमीनं पाकिस्तानी गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पाकिस्तानच्या शेअर बाजारात जोरदार घसरण झाली. बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात पाकिस्तानचा प्रमुख शेअर बाजार निर्देशांक कराची-१०० (KSE100) ६,२७२ अंकांनी (५.५%) घसरला. मंगळवारी बंद झालेल्या ११३,५६८.५१ च्या तुलनेत तो १०७,२९६.६४ च्या नीचांकी पातळीवर पोहोचला.

पहलगाम हल्ल्यानंतर पाक बाजारात घसरण सुरूच

काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. त्यानंतर पाकिस्तानच्या बाजारपेठेत जवळपास ८ टक्क्यांची घसरण झाली. तर दुसरीकडे सेन्सेक्स जवळपास २ टक्क्यांनी वधारलाय. येथे भारतीय शेअरमध्ये सुरुवातीच्या व्यवहारात १६० अंकांपर्यंत वाढ दिसून आली. सेन्सेक्सनं दिवसभरात ८०,८४४.६३ चा उच्चांक आणि ७९,९३७.४८ चा नीचांकी स्तर गाठला, तर निफ्टीनं २४,४४९.६० चा उच्चांक आणि २४,२२० चा नीचांकी स्तर गाठला.

FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश

भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं

पहलगाम हल्ल्यानंतर दोन आठवड्यांनंतर भारतीय सैन्य दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी स्थळांना लक्ष्य केलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तोयबाच्या तळासह पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर भारतीय सैन्यानं मध्यरात्री क्षेपणास्त्रांनी हल्ले केले.

Web Title: after operation sindoor What is the condition of the Pakistani stock market share market crash during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.