Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेंद्रिय शेतीसाठी ७0 लाख रुपयांना प्रशासकीय मान्यता

सेंद्रिय शेतीसाठी ७0 लाख रुपयांना प्रशासकीय मान्यता

राज्यामध्ये सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सेंद्रिय शेती धोरण राबविण्याचा निर्णय घेण्यात आला

By admin | Updated: May 24, 2014 04:18 IST2014-05-24T04:18:50+5:302014-05-24T04:18:50+5:30

राज्यामध्ये सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सेंद्रिय शेती धोरण राबविण्याचा निर्णय घेण्यात आला

Administrative approval for Rs 70 lakh for organic farming | सेंद्रिय शेतीसाठी ७0 लाख रुपयांना प्रशासकीय मान्यता

सेंद्रिय शेतीसाठी ७0 लाख रुपयांना प्रशासकीय मान्यता

वाशिम : राज्यामध्ये सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सेंद्रिय शेती धोरण राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, चालू आर्थिक वर्षासाठी ७0 लाख रुपयांच्या खर्चास नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्यात सेंद्रिय शेती धोरण राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने २२ मे रोजी ७० लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यावर होणारा खर्च २0१४-१५ या आर्थिक वर्षासाठी मंजूर केलेल्या अनुदानातून भागविण्यात येणार आहे. या निधीमधून विविध ठिकाणी प्रचार फलक लावणे, गांडुळ खतनिर्मिती, शेतकर्‍यांसाठी व शेतकरी बचत गटांकरिता मार्गदर्शनपर कार्यक्रम व प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहेत. निधीच्या खर्चाकरीता पुणेस्थित कृषी आयुक्तालयाचे संचालक (फलोत्पादन) यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Administrative approval for Rs 70 lakh for organic farming