8th Pay Commission Update : देशातील सर्वात मोठा आनंदाचा सण दिवाळीला आता काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारचेकर्मचारी आणि पेन्शनधारक मागील काही काळापासून आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर, त्यांच्यासाठी सध्या एक 'डबल' गुड न्यूज समोर येत आहे, ज्यामुळे त्यांना तात्काळ आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिवाळी सणापूर्वी महागाई भत्त्यात वाढ होण्याबाबत मोठी घोषणा केली जाऊ शकते. या वाढीचा थेट फायदा १.२ कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे.
दिवाळीपूर्वी महागाई भत्त्यात वाढ
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ५५ टक्के महागाई भत्ता मिळतो. महागाई लक्षात घेता, या DA मध्ये ३ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. ही वाढ झाल्यास, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दसरा आणि दिवाळीच्या खर्चासाठी अतिरिक्त पैसे उपलब्ध होतील.
पगारात किती वाढ होईल?
जर महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ झाली, तर कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातही वाढ होईल. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन ५०,००० रुपये असेल, तर त्याला दरमहा अंदाजे ३,००० रुपये अधिक मिळतील. महागाई भत्त्याची गणना 'ग्राहक किंमत निर्देशांक' (CPI-IW) च्या आधारावर केली जाते.
आठवा वेतन आयोग २०२६ मध्ये येणार?
कर्मचाऱ्यांसाठी दुसरी आनंदाची बातमी आठव्या वेतन आयोगाबाबत आहे. अलीकडील रिपोर्ट्सनुसार, आठवा वेतन आयोग २०२७ ऐवजी २०२६ च्या सुरुवातीलाच लागू होण्याची शक्यता आहे. या संदर्भात सरकारी कर्मचारी राष्ट्रीय परिसंघाच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेतली होती.
वाचा - मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
या भेटीत, मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्य सरकारांसोबत या विषयावर चर्चा सुरू असल्याची पुष्टी केली. लवकरच आयोगाबाबत आणि त्याच्या पॅनेलबाबत अधिकृत घोषणा केली जाण्याची अपेक्षा आहे. अशा प्रकारे, जरी कर्मचाऱ्यांची आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा कायम असली, तरी महागाई भत्त्यातील संभाव्य वाढ त्यांना तात्काळ दिलासा देईल, ज्यामुळे वाढत्या महागाईला सामोरे जाणे सोपे होईल.