Lokmat Money > बिझनेस न्यूज > २६ हिरे व्यापाऱ्यांचा मुंबईला कायमचा रामराम; सूरत डायमंड बोर्सला झाले शिफ्ट

२६ हिरे व्यापाऱ्यांचा मुंबईला कायमचा रामराम; सूरत डायमंड बोर्सला झाले शिफ्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या प्रकल्पाचे अनावरण मोदींच्या हस्ते १७ डिसेंबरला होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 04:30 PM2023-11-21T16:30:24+5:302023-11-21T16:31:26+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या प्रकल्पाचे अनावरण मोदींच्या हस्ते १७ डिसेंबरला होणार आहे.

26 Diamond traders are forever in Mumbai; Shifted to Surat Diamond Bourse | २६ हिरे व्यापाऱ्यांचा मुंबईला कायमचा रामराम; सूरत डायमंड बोर्सला झाले शिफ्ट

२६ हिरे व्यापाऱ्यांचा मुंबईला कायमचा रामराम; सूरत डायमंड बोर्सला झाले शिफ्ट

मुंबई - सूरत हे डायमंड सिटी नावानेही ओळखले जाते. परंतु सुविधांच्या अभावी याठिकाणाहून बहुतांश हिरे व्यापारी मुंबई महाराष्ट्रातून त्यांचा व्यवसाय करतात. परंतु आता मुंबईला मोठा फटका बसला आहे. कारण मुंबईच्या २६ हिरे व्यापाऱ्यांनी कायमचे त्यांचे ऑफिस सूरतला शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. सूरत डायमंड बोर्सच्या १३५ कार्यालयाचे आज औपचारिकरित्या उद्घाटन झाले. १३५ व्यापाऱ्यांपैकी २६ व्यापारी हे मुंबईचे कार्यालय बंद करून कायमचे सूरतला शिफ्ट झाले आहेत. 

दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर सूरत डायमंड बोर्सच्या ९८३ कार्यालयं असलेली इमारत सर्वांसमोर आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या प्रकल्पाचे अनावरण मोदींच्या हस्ते १७ डिसेंबरला होणार आहे. तत्पूर्वी याठिकाणी व्यापारांनी कार्यालयातून कामकाजाला सुरुवात केली. SBI ने २० नोव्हेंबरला डायमंड बोर्समध्ये एका शाखेचे उद्घाटन केले. जगभरातील हिरे व्यापारांची नजर सूरत डायमंड बोर्सवर आहे. 

काय म्हणाले व्यापारी?
५ वर्षाच्या मेहनतीनंतर आज सूरत डायमंड बोर्स कार्यरत होत आहे. आज १३५ कार्यालयातून कामकाजाला सुरुवात झाली. यातील २६ कंपन्या या महाराष्ट्रातून सूरतला येऊन त्यांचा कारभार सुरू करतायेत. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा बोर्स आहे. ही इमारत कशी बनवलीय हे पाहण्यासाठी आवश्य यायला हवे. सूरत हे मॅन्यूफॅक्चरिंग हब आहे. आमची कंपनी ट्रेंडिंग आणि मॅन्यूफॅक्चरिंग करते. त्यामुळे हे मॅन्यूफॅक्चरिंग हब असल्याने ट्रेंडर्ससोबत थेट संवाद साधता येऊ शकतो. जागतिक बाजारपेठेसोबत आम्ही स्पर्धा करू शकतो म्हणून आम्ही सूरतला आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

सूरत डायमंड बोर्स ही जगातील सर्वात जास्त कार्यालये असणारी मोठी इमारत आहे. याआधी अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय असलेल्या पेंटागनला या इमारतीने मागे टाकले. ६६ लाख स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या इमारतीच्या बांधकामासाठी सूरतचे ४२०० हिरे व्यापारी एकत्र आले. जवळपास ५ वर्षाच्या या कालावधीत तब्बल ५ हजार कोटी रुपये खर्च झाले. ३३ एकर जमिनीवर १५ मजल्यांचे ९ कॉम्प्लेस आहेत. त्यात १२५ लिफ्ट आणि ३०० स्क्वेअर फूटापासून ७५ हजार स्क्वेअर फूटापर्यंत कार्यालये आहेत. ज्यात एकावेळी ६७ हजार लोक काम करू शकतात. सूरत डायमंड बोर्समुळे दीड लाख लोकांना रोजगार मिळणार आहे.जगभरात १०० प्रकारे हिरे असतात आणि सूरतमध्ये यातील ९० प्रकारचा व्यापार होतो. १७५ देशात हिरे खरेदी केले जातात. 

Web Title: 26 Diamond traders are forever in Mumbai; Shifted to Surat Diamond Bourse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.