lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकारची जीएसटीतून २०.१८ लाख कोटी कमाई, मार्चमध्ये मिळाले १.७८ लाख कोटी रुपये

सरकारची जीएसटीतून २०.१८ लाख कोटी कमाई, मार्चमध्ये मिळाले १.७८ लाख कोटी रुपये

GST Revenue : देशांतर्गत विक्रीत वाढ झाल्याने मार्च महिन्यात (जीएसटी) संकलन ११.५ टक्क्यांनी वाढून १.७८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. संपूर्ण आर्थिक वर्षात (एप्रिल २०२३-मार्च २०२४) एकूण जीएसटी संकलन २०.१८ लाख कोटी रुपये झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 07:37 AM2024-04-02T07:37:52+5:302024-04-02T07:38:10+5:30

GST Revenue : देशांतर्गत विक्रीत वाढ झाल्याने मार्च महिन्यात (जीएसटी) संकलन ११.५ टक्क्यांनी वाढून १.७८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. संपूर्ण आर्थिक वर्षात (एप्रिल २०२३-मार्च २०२४) एकूण जीएसटी संकलन २०.१८ लाख कोटी रुपये झाले.

20.18 lakh crore of government's revenue from GST, Rs 1.78 lakh crore received in March | सरकारची जीएसटीतून २०.१८ लाख कोटी कमाई, मार्चमध्ये मिळाले १.७८ लाख कोटी रुपये

सरकारची जीएसटीतून २०.१८ लाख कोटी कमाई, मार्चमध्ये मिळाले १.७८ लाख कोटी रुपये

नवी दिल्ली - देशांतर्गत विक्रीत वाढ झाल्याने मार्च महिन्यात (जीएसटी) संकलन ११.५ टक्क्यांनी वाढून १.७८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. संपूर्ण आर्थिक वर्षात (एप्रिल २०२३-मार्च २०२४) एकूण जीएसटी संकलन २०.१८ लाख कोटी रुपये झाले असून, हे करसंकलन गेल्या वर्षाच्या तुलनेत ११.७ टक्क्यांनी अधिक आहे. हा एक मैलाचा दगड असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.मार्च २०२४ मध्ये जीएसटी महसूल वार्षिक ११.५ टक्क्यांनी वाढून १.७८ लाख कोटी रुपयांच्या दुसऱ्या सर्वोच्च पातळीवर आहे. 

सर्वाधिक वाटा कोणाचा ?
राज्य    मार्च २०२४    वाढ
महाराष्ट्र    २७,६८८ कोटी    २२% 
कर्नाटक    १३,०१४ कोटी    २६% 
गुजरात    ११,३९२ कोटी    १५% 
तामिळनाडू    ११,०१७ कोटी    १९% 
यांचा वाटा घसरला 
राज्य        झालेली घट 
मिझोराम        -२९%
इतर प्रदेश    -२१%
लक्षद्वीप    -१८%
अंदमान निकोबार    -१४%

Web Title: 20.18 lakh crore of government's revenue from GST, Rs 1.78 lakh crore received in March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.