lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > २ मिनिटांची गुगल मीट आणि २०० कर्मचाऱ्यांना मिळाला नारळ, 'हे' स्टार्टअप व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत

२ मिनिटांची गुगल मीट आणि २०० कर्मचाऱ्यांना मिळाला नारळ, 'हे' स्टार्टअप व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत

२ मिनिटांसाठी कर्मचार्‍यांचा Google मीट कॉल आयोजित करण्यात आला आणि यादरम्यान त्यांना ही माहिती देण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 02:38 PM2024-01-06T14:38:24+5:302024-01-06T14:38:47+5:30

२ मिनिटांसाठी कर्मचार्‍यांचा Google मीट कॉल आयोजित करण्यात आला आणि यादरम्यान त्यांना ही माहिती देण्यात आली.

2 minutes of Google Meet call and 200 people lost their job Frontdesk american startup shut down the business | २ मिनिटांची गुगल मीट आणि २०० कर्मचाऱ्यांना मिळाला नारळ, 'हे' स्टार्टअप व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत

२ मिनिटांची गुगल मीट आणि २०० कर्मचाऱ्यांना मिळाला नारळ, 'हे' स्टार्टअप व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत

layoff news: अमेरिकन स्टार्टअप Frontdesk नं यावर्षात आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. या कंपनीनं २ मिनिटांच्या व्हर्च्युअल कॉलद्वारे आपल्या २०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. टेकक्रंचच्या रिपोर्टनुसार, २ मिनिटांसाठी कर्मचार्‍यांचा Google मीट कॉल आयोजित करण्यात आला आणि यादरम्यान कामावरुन कमी करण्यात येत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्याची माहिती देण्यात आली.

काय म्हटलं कंपनीच्या सीईओनं

रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की, स्टार्टअप कंपनी फ्रंटडेस्कचे सीईओ जेसी डीपिंटो यांनी कॉल दरम्यान कंपनीच्या आर्थिक समस्येबद्दल कर्मचाऱ्यांना माहिती दिली. यासोबतच कंपनीच्या दिवाळखोरीच्या अर्जाचे संकेतही देण्यात आले आहेत. याचा अर्थ कंपनी स्वतःला दिवाळखोर घोषित करण्याच्या तयारीत आहे. यासाठी लवकरच अर्जही दिला जाऊ शकतो. 

स्टार्टअपचा बिझनेस मॉडेल वेगवेगळ्या आघाड्यांवर संघर्ष करत आहे. जेट ब्ल्यू व्हेन्चर्स आणि वेरिटास इन्व्हेस्टमेंट्स सारख्या गुंतवणूकदारांकडून अंदाजे २६ मिलियन डॉलर्सचा निधी उभारल्यानंतरही कंपनीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचंही व्हर्च्युअल बैठकीदरम्यान सीईओंनी सांगितलं.

Xerox मध्येही कर्मचारी कपात

३ जानेवारी रोजी झेरॉक्सनं १५ टक्के कर्मचारी कमी करण्याचा आपला विचार असल्याचं जाहीर केलं. एका रिपोर्टनुसार, कंपनीत सुमारे २०,५०० कर्मचारी होते. या छाटणीच्या घोषणेचा अंदाजे ३ हजार कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे. ही अमेरिकन कंपनी डिजिटल प्रिंटिंग आणि दस्तऐवज व्यवस्थापन तंत्रज्ञानामध्ये सक्रिय आहे.

Web Title: 2 minutes of Google Meet call and 200 people lost their job Frontdesk american startup shut down the business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी