Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोट्यधीश करणारे १० स्टॉक्स! २८ वर्षांत १०,००० रुपयांचे केले तब्बल १९ कोटी! तुमच्याकडे कोणता आहे?

कोट्यधीश करणारे १० स्टॉक्स! २८ वर्षांत १०,००० रुपयांचे केले तब्बल १९ कोटी! तुमच्याकडे कोणता आहे?

Multibagger Stocks : शेअर बाजारात दीर्घकाळ गुंतवणूक करणारेच मोठी कमाई करू शकतात. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 16:16 IST2025-11-27T16:13:22+5:302025-11-27T16:16:25+5:30

Multibagger Stocks : शेअर बाजारात दीर्घकाळ गुंतवणूक करणारेच मोठी कमाई करू शकतात. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

10 stocks that made you a millionaire! 10,000 rupees turned into 19 crores in 28 years! Which one do you have?Multibagger Alert Top 10 Stocks That Delivered 1,35,000% to 19,00,000% Return Since 1998 | कोट्यधीश करणारे १० स्टॉक्स! २८ वर्षांत १०,००० रुपयांचे केले तब्बल १९ कोटी! तुमच्याकडे कोणता आहे?

कोट्यधीश करणारे १० स्टॉक्स! २८ वर्षांत १०,००० रुपयांचे केले तब्बल १९ कोटी! तुमच्याकडे कोणता आहे?

Multibagger Stocks :शेअर बाजारात धैर्य आणि दीर्घकालीन गुंतवणूक करणारेच श्रीमंत होतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ब्रोकरेज फर्म सीएलएसएच्या 'करोडपती शेअर्स'च्या यादीने याचे उत्तम उदाहरण दिले आहे. या यादीनुसार, गेल्या २८ वर्षांत अवघ्या १०,००० रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य १.३५ कोटी ते १९ कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. सीएलएसएच्या अहवालानुसार, या शेअर्सनी १,३५,०००% ते १९,००,०००% पर्यंत म्हणजेच १,३५० पट ते १९,००० पट पर्यंत अविश्वसनीय परतावा दिला आहे.

सर्वाधिक परतावा देणारा शेअर
या यादीत वेस्टलाईफ फूडवर्क्स या शेअरने सर्वाधिक परतावा दिला आहे. या स्टॉक्सची सुरुवातीची किंमत (१९९८) साली फक्त ०.०३ रुपये होती. तर आताची किंमत ५७५ रुपये आहे. म्हणजे या शेअरने १९,१७० पट परतावा दिला आहे. २८ वर्षांपूर्वी एखाद्याने १०,००० रुपये गुंतवले असते तर आज त्याचे १९.१७ कोटी रुपये झाले असते.

'करोडपती शेअर्स' आणि त्यांचा परतावा
वेस्टलाईफ फूडवर्क्सव्यतिरिक्त, इतर मल्टीबॅगर शेअर्सनीही गुंतवणूकदारांना मोठे रिटर्न दिले आहेत.
हॅवेल्स इंडिया : या शेअरने २८ वर्षांत ६,५८,६००% परतावा दिला. १०,००० रुपयाचे मूल्य ६.५९ कोटी रुपये झाले.
आयशर मोटर्स : या शेअरने ४,८१,०००% परतावा दिला. १०,००० रुपयाचे मूल्य ४.८१ कोटी रुपये झाले.

बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील कमाल
आर्थिक क्षेत्रातील दोन दिग्गज कंपन्यांनीही कोट्यधीश बनवणाऱ्या शेअर्सच्या यादीत आपले स्थान निश्चित केले.
बजाज फायनान्सने २८ वर्षांत ४,१०,१३१% इतका उत्कृष्ट परतावा दिला.
कोटक महिंद्रा बँकेने २,३७,३०३% चा दमदार परतावा.

इतर दमदार कामगिरी करणारे शेअर्स
सीएलएसएच्या यादीत समाविष्ट असलेल्या इतर कंपन्यांचा २८ वर्षांतील परतावा खालीलप्रमाणे आहे, ज्यामुळे १०,००० रुपयांचे मूल्य १ कोटींपेक्षा अधिक झाले.

  • संवर्धन मदरसन : २,२२,३२७% परतावा.
  • भारत इलेक्ट्रॉनिक्स : १,६५,६००% परतावा.
  • टायटन कंपनी : १,४७,११९% परतावा.
  • श्री सिमेंट : १,४३,९५७% परतावा.
  • मणप्पुरम फायनान्स : १,३५,२२५% परतावा.

वाचा - फक्त १२ रुपये प्रति दिन दरात मिळवा ३ लाखांचा आरोग्य विमा; PhonePe ची मोठी घोषणा, काय आहेत फायदे?

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : मल्टीबैगर स्टॉक्स: 28 वर्षों में ₹10,000 से ₹19 करोड़!

Web Summary : धैर्य का फल! कुछ स्टॉक्स ने 28 वर्षों में ₹10,000 को करोड़ों में बदला। वेस्टलाइफ फूडवर्क्स 19,170% रिटर्न के साथ सबसे आगे रहा। हैवल्स, आयशर, बजाज फाइनेंस और कोटक बैंक ने भी शानदार वृद्धि दी, जिससे दीर्घकालिक निवेशकों के लिए धन का सृजन हुआ।

Web Title : Multibagger Stocks: ₹10,000 to ₹19 Crore in 28 Years!

Web Summary : Patience pays! Some stocks turned ₹10,000 into crores over 28 years. Westlife Foodworks led with a staggering 19,170% return. Havells, Eicher, Bajaj Finance, and Kotak Bank also delivered exceptional growth, creating wealth for long-term investors.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.