7 flexi cap mutual fund schemes : २०२४ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. हे वर्ष तुमच्याही आयुष्यात अनेक चांगल्या वाईट घटनांनी भरलेले असेल. आर्थिक दृष्टीकोनातून बोलायचं झालं तर ज्या गुंतवणूकदारांनी हुशारीने निर्णय घेतले आहेत. ते मालामाल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांची माहिती आपण घेऊयात. कदाचित, तुमचीही गुंतवणूक यामध्ये असेल. आज आपण अशा ७ म्युच्युअल फंड योजनांबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी या वर्षी गुंतवणूकदारांना ४७% पर्यंत मजबूत परतावा दिला आहे.
मोतीलाल ओसवाल फ्लेक्सी कॅप फंड टॉपवर
मोतीलाल ओसवाल फ्लेक्सी कॅप फंड हा फ्लेक्सिकॅप म्युच्युअल फंड योजनेतील सर्वोच्च कामगिरी करणारा फंड आहे. या फंडाने २०२४ मध्ये ४७.४०% बंपर परतावा दिला. Invesco India Flexicap Fund आणि JM Flexicap फंडने याच कालावधीत अनुक्रमे ३७.८५% आणि ३६.७९% परतावा दिला आहे. बँक ऑफ इंडिया फ्लेक्सी कॅप फंडाने या कॅलेंडर वर्षात ३५.४३% परतावा दिला. याच कालावधीत हेलिओस फ्लेक्सी कॅप फंड आणि 360 वन फ्लेक्सी कॅप फंडने अनुक्रमे ३२.२६% आणि ३१.६१% परतावा दिला. HDFC फ्लेक्सी कॅप फंडाने याच कालावधीत २७.०१% परतावा दिला.
या फ्लेक्सी फंडांनी केली निराशा
मिराए एसेट फ्लेक्सी कॅप फंडाने त्याच्या बेंचमार्कच्या तुलनेत २०.८१% परतावा देत, NIFTY 500 - TRI च्या २०.८६% परताव्याच्या तुलनेत २०.८१ टक्के रिटर्न दिले. त्याचप्रमाणे, निप्पॉन इंडिया फ्लेक्सी कॅप फंड आणि महिंद्रा मॅन्युलाइफ फ्लेक्सी कॅप फंड देखील त्यांच्या बेंचमार्क, NIFTY 500 - TRI ला मागे टाकण्यात अपयशी ठरले. क्वांट फ्लेक्सी कॅप फंडाने २०२४ मध्ये १८.२०% परतावा दिला, जो त्याच्या बेंचमार्कपेक्षा कमी आहे, ज्याने २०.८६% परतावा दिला. SBI फ्लेक्सी कॅप फंडाने देखील १८.१५% परतावा दिला. हा फंडदेखील बेंचमार्कला मागे टाकू शकला नाही.
फ्लेक्सी कॅप फंड म्हणजे काय?
फ्लेक्सी कॅप हा देखील म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे. या प्रकारच्या फंडात, फंड व्यवस्थापक गुंतवणूकदाराचे पैसे त्याच्या आवडीनुसार स्मॉल, मिड किंवा लार्ज कॅपमध्ये गुंतवतो. यामध्ये फंड मॅनेजरने कोणत्या फंड श्रेणीत किती गुंतवणूक करावी याचे बंधन नसते. त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो.