Lokmat Money >म्युच्युअल फंड > म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली अन् विसरुन गेले? SEBI ने घेतला मोठा निर्णय

म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली अन् विसरुन गेले? SEBI ने घेतला मोठा निर्णय

mutual funds : म्युच्युअल फंडामध्ये विसरुन गेलेली गुंतवणूक शोधणे आता सोपे होणार आहे. सेबीने यासाठी नवीन प्लॅटफॉर्म विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 14:47 IST2024-12-18T14:40:56+5:302024-12-18T14:47:46+5:30

mutual funds : म्युच्युअल फंडामध्ये विसरुन गेलेली गुंतवणूक शोधणे आता सोपे होणार आहे. सेबीने यासाठी नवीन प्लॅटफॉर्म विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

sebi plans search platform lost track of inactive mutual funds | म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली अन् विसरुन गेले? SEBI ने घेतला मोठा निर्णय

म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली अन् विसरुन गेले? SEBI ने घेतला मोठा निर्णय

mutual funds : अनेकदा आईवडील मुलांच्या नावे मोठी गुंतवणूक करतात. पण, दीर्घकालीन गुंतवणूक केली असल्यास त्याचा अनेकदा विसर पडतो. अशा स्थितीत मुलांना त्याचा लाभ घेता येत नाही. नुकतेच एलआयसीने त्यांच्याकडे दावा न केलेले ८८० कोटी रुपये पडून असल्याचे जाहीर केले. तसेच पॉलिसीधारकांनी दावा करुन पैसे घ्यावे असं आवाहनही त्यांनी केलं आहे. अशीच काहीशी अवस्था शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचीही होते. कधीतरी आपण शेअर्स घेतो आणि विसरुन जातो. मात्र, यापुढे असे काहीही होणार नाही. म्युच्युअल फंड विसरलेल्या गुंतवणूकदारांना आता त्याचा शोध घेणे सोपे होणार आहे. बाजार नियामक सेबीने (SEBI) गुंतवणूकदारांसाठी निष्क्रिय आणि दावा न केलेले म्युच्युअल फंड (MF) फोलिओ शोधण्यासाठी एक प्लॅटफॉर्म विकसित करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

सेबीने आपल्या कन्सल्टेशन पेपरमध्ये म्हटले आहे की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रेसिंग अँड रिट्रीव्हल असिस्टंट (MITR) नावाचा प्रस्तावित प्लॅटफॉर्म दोन आघाडीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट्स (RTAs) CAMS आणि KFintech द्वारे विकसित केला जाईल.

या प्लॅटफॉर्मद्वारे गुंतवणूकदारांना विसर पडलेल्या म्युच्युअल फंडाचा शोध घेता येईल. मात्र, कुठल्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी केवायसी करणे करावी लागणार आहे. या प्लॅटफॉर्मचा उद्देश दावा न केलेले म्युच्युअल फंड फोलिओ कमी करणे आणि पारदर्शक आर्थिक परिसंस्था तयार करण्याचा आहे. अनेक ठिकाणी गुंतवणूक असल्याने कधीकधी ते विसरुन जातात.

खाती निष्क्रिय कशी होतात?
ओपन-एंडेड ग्रोथ पर्यायांसह म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक जोपर्यंत गुंतवणूकदार, त्याचे नॉमिनी किंवा कायदेशीर वारस संबंधित मालमत्ता व्यवस्थापन कंपनीकडे (AMC) हस्तांतरणासाठी संपर्क साधत नाही तोपर्यंत गुंतवणूक राहू शकते. पॅन, ईमेल आयडी किंवा वैध पत्ता उपलब्ध नसल्याने हे MF फोलिओ युनिटधारकाच्या एकात्मिक खाते विवरणात दिसत नाही. अशाप्रकारे, ही म्युच्युअल फंड खाती निष्क्रिय होतात. अशी खात्यात फसवणूक वाढण्याची शक्यता वाढते. हीच चिंता दूर करण्यासाठी सेबीने नवीन प्लॅटफॉर्म विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
 

Web Title: sebi plans search platform lost track of inactive mutual funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.