Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >म्युच्युअल फंड > शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला

शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला

Mutual Fund Investment Slows : गेल्या दोन महिन्यांत गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक कमी केली आहे. सप्टेंबरमध्ये म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक ९ टक्क्यांनी घटली, तर ऑगस्टमध्येही २२ टक्क्यांनी घट झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 16:51 IST2025-10-10T16:29:36+5:302025-10-10T16:51:09+5:30

Mutual Fund Investment Slows : गेल्या दोन महिन्यांत गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक कमी केली आहे. सप्टेंबरमध्ये म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक ९ टक्क्यांनी घटली, तर ऑगस्टमध्येही २२ टक्क्यांनी घट झाली.

Mutual Fund Investment Slows Equity Inflow Drops for Second Month, Gold ETF Investments Surge by 300% | शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला

शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला

Mutual Fund Investment Slows : गेल्या वर्षभरात टॅरिफ, भूराजकीय आव्हाने, परदेशी गुंतवणूकदारांची पाठ असे अनेक धक्के भारतीय शेअर बाजाराने पचवले. कारण, भारतीय बाजाराकडे म्युच्युअल फंडात येणाऱ्या पैशांचा पाठिंबा होता. मात्र, ही परिस्थिती आता बदलत चालल्याचे समोर आले आहे. शेअर बाजारात होणारी वाढ पाहता म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांचा कल मागील दोन महिन्यांपासून काहीसा बदललेला दिसत आहे. बाजार विक्रमी पातळीवर असल्याने गुंतवणूकदारांनी इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करण्यापासून काहीसा हात आखडता घेतल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

ॲम्फीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडांतील निधीचा ओघ ९ टक्क्यांनी घसरला आहे. सप्टेंबरमध्ये हा ओघ ३०,४२१ कोटी रुपये राहिला, जो ऑगस्टमध्ये ३३,४३० कोटी रुपये होता. या घसरणीमुळे बाजार मूल्यांकनाबद्दल गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरी असल्याचे संकेत मिळत आहेत.

लार्ज कॅप, स्मॉल कॅपमध्ये मोठी घसरण
बाजाराचे मूल्यांकन वाढल्यामुळे गुंतवणूकदारांनी विशेषतः लार्ज कॅप (१८%), मिड कॅप (४.५%) आणि स्मॉल कॅप (१२.६%) फंडांमधून गुंतवणूक कमी केली आहे. तसेच, लवचिक मानले जाणारे फ्लेक्सी कॅप फंडांमधील ओघही ₹७,६७९ कोटींवरून ₹७,०२९ कोटींवर आला आहे. ही सलग दुसरी मासिक घसरण आहे, ज्यामुळे बाजारातील एकूण गुंतवणूकदारांच्या भावनांमध्ये बदल झाल्याचे दिसत आहे.

गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे!
इक्विटी फंडातून निधीचा ओघ मंदावला असला तरी, अस्थिर जागतिक वातावरण आणि महागाईमुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे मोर्चा वळवला आहे.
गोल्ड ईटीएफमध्ये मोठी वाढ : सप्टेंबर महिन्यात गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक ₹२,१८९ कोटींवरून तब्बल ₹८,३६३ कोटींवर पोहोचली आहे. सोन्याच्या विक्रमी किमतीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार सोन्याला अधिक महत्त्व देत असल्याचे यातून स्पष्ट होते.
नवे फंड : सप्टेंबरमध्ये नऊ नवे फंड बाजारात आले, ज्यातून एकत्रितपणे ₹१,९५९ कोटींचा निधी जमा झाला.

मिड कॅप, स्मॉल कॅपमध्ये अजूनही विश्वास
एकंदरीत इक्विटी फंडांचा ओघ कमी झाला असला तरी, ११ पैकी बहुतेक म्युच्युअल फंड प्रकारांमध्ये अजूनही सकारात्मक गुंतवणूक झाली आहे (डिव्हिडंड यील्ड आणि ELSS वगळता).

  • मिड कॅप फंड्स: यांनी सर्वाधिक लक्ष वेधले असून, यात ₹५,०८५ कोटींचा निधी आला.
  • स्मॉल कॅप फंड्स: या प्रकारातही ₹४,३६२ कोटींची मजबूत गुंतवणूक झाली.
  • चांगली वाढ: महिन्या-दर-महिना मल्टीकॅप (११%), लार्ज अँड मिडकॅप (१४%), व्हॅल्यू (८५%) आणि फोकस्ड फंड्स (२२%) मध्ये गुंतवणूक वाढली आहे.
  • या उलट, ELSS फंडांतून ₹३०७ कोटी आणि डिविडंड यील्ड फंडांतून ₹१६७ कोटींचा निधी बाहेर काढला गेला.

वाचा - नवीन मालकाच्या अपघाताचा ४ लाखांचा भुर्दंड जुन्या मालकाला! गाडी विकताना तुम्ही तर 'ही' चूक केली नाही ना?

शेअर मार्केट तज्ज्ञांचा निष्कर्ष
गुंतवणूकदारांचा हा बदललेला कल सूचित करतो की, बाजारात सध्या निवडक खरेदी सुरू आहे. एका बाजूला गुंतवणूकदार मूल्यांकनामुळे सावध झाले असून, जास्त परताव्याच्या अपेक्षेने मिड कॅप आणि स्मॉल कॅपवर विश्वास ठेवत आहेत. तर दुसरीकडे, जागतिक अस्थिरतेपासून संरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी सोन्याला सुरक्षित आश्रयस्थान मानले आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी बाजार सुधारण्याची वाट न पाहता SIP द्वारे गुंतवणूक सुरू ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

Web Title : अस्थिर बाजार से निवेशकों का भरोसा डगमगाया; निवेश सोने की ओर!

Web Summary : निवेशकों के सतर्क होने से म्यूचुअल फंड में निवेश धीमा हुआ। लार्ज, मिड और स्मॉल-कैप फंडों में गिरावट देखी गई। वैश्विक अनिश्चितता के बीच सोने में निवेश बढ़ा, निवेशक सुरक्षित ठिकाना ढूंढ रहे हैं। विशेषज्ञ एसआईपी निवेश जारी रखने की सलाह देते हैं।

Web Title : Unstable market shakes investor confidence; investment shifts to gold.

Web Summary : Mutual fund inflows slow as investors turn cautious. Large, mid, and small-cap funds see declines. Gold investments surge amid global uncertainty, with investors seeking safe havens. Experts advise continued SIP investments.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.