Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >म्युच्युअल फंड > बाजारातील अस्थिरतेत कोणता फंड चांगला? 'मल्टि-ॲसेट' की 'फ्लेक्सी-कॅप'? कुठे होईल जास्त फायदा?

बाजारातील अस्थिरतेत कोणता फंड चांगला? 'मल्टि-ॲसेट' की 'फ्लेक्सी-कॅप'? कुठे होईल जास्त फायदा?

Mutual Funds : गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडांच्या अनेक श्रेणी उपलब्ध असल्या तरी, प्रत्येकाचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. या लेखात, आपण मल्टी-अ‍ॅसेट फंड आणि फ्लेक्सी-कॅप फंडांबद्दल तपशीलवार माहिती देऊ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 15:26 IST2025-11-16T15:26:08+5:302025-11-16T15:26:50+5:30

Mutual Funds : गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडांच्या अनेक श्रेणी उपलब्ध असल्या तरी, प्रत्येकाचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. या लेखात, आपण मल्टी-अ‍ॅसेट फंड आणि फ्लेक्सी-कॅप फंडांबद्दल तपशीलवार माहिती देऊ.

Multi-Asset vs Flexi-Cap Funds: Which Mutual Fund is Better for Volatile Markets? | बाजारातील अस्थिरतेत कोणता फंड चांगला? 'मल्टि-ॲसेट' की 'फ्लेक्सी-कॅप'? कुठे होईल जास्त फायदा?

बाजारातील अस्थिरतेत कोणता फंड चांगला? 'मल्टि-ॲसेट' की 'फ्लेक्सी-कॅप'? कुठे होईल जास्त फायदा?

Mutual Funds : गेल्या काही महिन्यांपासून जागतिक स्तरावरील तणाव आणि राजकीय बदलांमुळे इक्विटी बाजारातील भावनांवर मोठा परिणाम झाला आहे. अशा अनिश्चित वातावरणात अनेक आर्थिक तज्ज्ञ थेट शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याऐवजी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर मानतात. मात्र, यातही चांगला परतावा मिळवण्यासाठी 'मल्टि-ॲसेट' की 'फ्लेक्सी-कॅप' कोणत्या पर्यायात गुंतवणूक करावी याबद्दल अनेकांचा गोंधळ होतो. याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, आज आपण बाजारातील दोन महत्त्वाच्या फंड प्रकारांची मल्टि-ॲसेट फंड आणि फ्लेक्सी-कॅप फंड सविस्तर माहिती पाहूया.

मल्टि-ॲसेट फंड
मल्टि-ॲसेट फंड हे असे फंड आहेत, जे तीन किंवा त्याहून अधिक ॲसेट क्लास (उदा. इक्विटी, डेट (बॉन्ड) आणि गोल्ड) मध्ये गुंतवणूक करतात. एकाच फंडात शेअर्स, बॉन्ड आणि सोन्याचे मिश्रण असल्यामुळे गुंतवणुकीतील जोखीम विभागली जाते. जर शेअर बाजारात घसरण झाली, तर गोल्ड किंवा डेटमध्ये झालेली वाढ ही घसरण संतुलित करते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसत नाही. या फंडांचा परतावा अल्प कालावधीत (-०.७८% ते +०.४६%) चढ-उतार दर्शवतो. मात्र, तीन आणि सहा महिन्यांच्या कालावधीत अनेक फंडांनी ८ ते ११ टक्क्यांपर्यंत चांगला परतावा दिला आहे.

फ्लेक्सी-कॅप फंड
फ्लेक्सी-कॅप फंड पूर्णपणे इक्विटीमध्ये गुंतवणूक करतात, परंतु फंड व्यवस्थापकाला मोठ्या, मध्यम आणि लहान कॅप कंपन्यांमध्ये हव्या त्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. बाजार अस्थिर असताना किंवा विशिष्ट क्षेत्रांमध्ये संधी दिसल्यावर फंड व्यवस्थापक त्वरित गुंतवणुकीचे प्रमाण बदलू शकतो. वर्ष २०२५ मध्ये बाजारात अस्थिरता असूनही, बहुतेक मोठ्या फ्लेक्सी-कॅप फंडांनी निफ्टी ५०० टीआरआय या बेंचमार्कपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. गेल्या एका वर्षात १० पैकी ८ मोठ्या फ्लेक्सी-कॅप फंडांनी १० ते १३ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे, तर बेंचमार्कचा परतावा केवळ ८% च्या आसपास राहिला आहे.

तुमच्यासाठी कोणता फंड योग्य?
मल्टि-ॲसेट फंड

ज्यांना कमी जोखीम घेऊन स्थिर आणि सातत्यपूर्ण परतावा हवा आहे. बाजारातील मोठ्या चढ-उतारांपासून पोर्टफोलिओचे संरक्षण करतो.

वाचा - १८ व्या वर्षी तुमचं मुल होईल कोट्यधीश! SSY, NPS आणि PPF सह 'या' ६ योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक

फ्लेक्सी-कॅप फंड
ज्यांना बाजारातील संधींचा फायदा घेऊन जास्त परतावा मिळवायचा आहे आणि त्यासाठी मध्यम ते उच्च जोखीम पत्करण्याची तयारी आहे. फंड व्यवस्थापकाच्या कौशल्यामुळे तो बाजारातील बदलानुसार त्वरित निर्णय घेऊन बेंचमार्कपेक्षा जास्त परतावा देऊ शकतो. आर्थिक ध्येयांनुसार आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य फंडाची निवड करणे महत्त्वाचे आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : बाजार अस्थिरता में मल्टी-एसेट या फ्लेक्सी-कैप फंड: कौन सा बेहतर है?

Web Summary : बाजार अस्थिरता के बीच, विशेषज्ञ म्यूचुअल फंड का सुझाव देते हैं। मल्टी-एसेट फंड इक्विटी, डेट और गोल्ड में विविधता के माध्यम से स्थिरता प्रदान करते हैं। फ्लेक्सी-कैप फंड लचीले आवंटन के साथ इक्विटी में निवेश करते हैं, जिससे संभावित रूप से उच्च रिटर्न मिलता है, लेकिन जोखिम अधिक होता है। जोखिम लेने की क्षमता और वित्तीय लक्ष्यों के आधार पर चुनें।

Web Title : Multi-Asset or Flexi-Cap Funds: Which is better in market volatility?

Web Summary : Amid market volatility, experts suggest mutual funds. Multi-asset funds offer stability via diversification across equity, debt, and gold. Flexi-cap funds invest in equities with flexible allocation, potentially yielding higher returns, but with higher risk. Choose based on risk appetite and financial goals.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.