Lokmat Money >म्युच्युअल फंड > नवीन वर्षात गुंतवणूक करताना या ५ चुका चुकूनही करू नका; आयुष्यभर होईल पश्चाताप

नवीन वर्षात गुंतवणूक करताना या ५ चुका चुकूनही करू नका; आयुष्यभर होईल पश्चाताप

money making tips : बचत तुम्हाला पैसे वाचवण्यास मदत करतो. परंतु, गुंतवणूक तुम्हाला भविष्यासाठी आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवते. गुंतवणूक फक्त पैशांची बचतच नाही तर पैसे वाढवण्यासही मदत करते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 13:59 IST2024-12-24T13:58:41+5:302024-12-24T13:59:54+5:30

money making tips : बचत तुम्हाला पैसे वाचवण्यास मदत करतो. परंतु, गुंतवणूक तुम्हाला भविष्यासाठी आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवते. गुंतवणूक फक्त पैशांची बचतच नाही तर पैसे वाढवण्यासही मदत करते.

money making tips leave these 5 investment habits in 2024 if you want to grow your portfolio in 2025 | नवीन वर्षात गुंतवणूक करताना या ५ चुका चुकूनही करू नका; आयुष्यभर होईल पश्चाताप

नवीन वर्षात गुंतवणूक करताना या ५ चुका चुकूनही करू नका; आयुष्यभर होईल पश्चाताप

money making tips : केवळ पैसे गुंतवणे महत्त्वाचे नाही तर योग्य ठिकाणी लावणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एसआयपी हा गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. परंतु, अनेकवेळा एसआयपी करताना या चुका केल्या जातात. आज आपण अशा ५ चुकांबद्दल बोलणार आहोत. ज्यांमुळे लोक आपल्या आर्थिक प्रगतीचा वेग कमी करतात. नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा करताना या गोष्टी टाळता आल्या पाहिजेत.
 
पहिल्यांदा जाणून घेऊया SIP म्हणजे काय? एसआयपी ही पद्धतशीर गुंतवणूक योजना आहे. यामध्ये ठराविक अंतराने ठराविक रक्कम गुंतवली जाते. यावर तुम्हाला व्याज आणि नंतर चक्रवाढ व्याज मिळते. अशा प्रकारे तुम्ही केलेली छोटी गुंतवणूक मोठा फंड तयार करते. आता जाणून घेऊया त्या ५ चुका ज्या तुम्हाला या वर्षात सोडायच्या आहेत.

कोणत्याही उद्दिष्टाशिवाय एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे 
कोणतेही स्पष्ट ध्येय नसताना एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे ही मोठी चूक असू शकते. घर खरेदी करणे, मुलाच्या शिक्षणासाठी बचत करणे किंवा सेवानिवृत्तीसाठी बचत करणे यासारखे तुमच्या गुंतवणुकीसाठी विशिष्ट आर्थिक उद्दिष्ट निश्चित करणे खूप महत्त्वाचे आहे. ध्येयांशिवाय, तुम्ही तुमच्या प्रगतीचे अचूक मूल्यांकन करू शकणार नाही. परिणामी तुमची गुंतवणूक तुमच्या गरजेनुसार काम करणार नाही.

विचार न करता फंड निवडणे
विचार न करता फंड निवडणे तुमच्या गुंतवणुकीच्या वेगाला हानी पोहोचवू शकते. अनेक वेळा लोक लोकप्रिय फंड पाहिल्यानंतर गुंतवणूक करतात. परंतु, प्रत्येक फंडाची स्वतःची रणनीती, परतावा आणि जोखीम पातळी असते. त्यामुळे अभ्यास न करता गुंतवणूक करणे चुकीचे ठरू शकते. तुम्हाला शक्य नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

तुमच्या एसआयपीचे नियमितपणे आढावा घेणे
तुमच्या एसआयपीचा नियमितपणे आढावा न घेणे ही देखील मोठी चूक आहे. जसजसे बाजार बदलतात आणि तुमची आर्थिक उद्दिष्टे वाढत जातात, तसतसे तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओचे मूल्यांकन करणे महत्त्वाचे होते. नियमित आढावा घेतल्यास कोणते फंड कमी कामगिरी करत आहेत हे समजून घेण्यास मदत होते. त्यात बदल करुन तुमचे उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न करता येईल.  

बाजारातील जोखमीकडे दुर्लक्ष करणे  
बाजारातील जोखीम समजून न घेता एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते. एसआयपी ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. बाजारातील चढउतार त्याचाच एक भाग आहेत. या जोखमींकडे दुर्लक्ष केल्यास बाजारातील घसरणीच्या वेळी चुकीचे निर्णय घेतली जाण्याची शक्यता आहे.

एसआयपीची रक्कम न वाढवणे
दीर्घकाळ समान एसआयपी रकमेवर चिकटून राहिल्याने तुमची कमाई क्षमता मर्यादित होऊ शकते. जसे तुमचे उत्पन्न वाढते किंवा तुमची आर्थिक स्थिती सुधारते, तुमचे SIP योगदान देखील वाढले पाहिजे. विशेषत: जेव्हा तुम्ही तरुण असाल आणि चक्रवाढीसाठी जास्त वेळ असेल, तेव्हा योगदान वाढवल्याने गुंतवणूक जलद वाढते.
 

Web Title: money making tips leave these 5 investment habits in 2024 if you want to grow your portfolio in 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.