Lokmat Money >म्युच्युअल फंड > ५० हजार पगार आणि तेवढेच साइड इन्कम! होय, हे तुम्हीही करू शकता, जाणून घ्या कसे?

५० हजार पगार आणि तेवढेच साइड इन्कम! होय, हे तुम्हीही करू शकता, जाणून घ्या कसे?

Side Income Formula : जर तुमचा मासिक पगार ५० हजार रुपये असेल तर तेवढेच साइड इन्कम तुम्ही देखील कमावू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 14:14 IST2024-12-16T14:12:03+5:302024-12-16T14:14:14+5:30

Side Income Formula : जर तुमचा मासिक पगार ५० हजार रुपये असेल तर तेवढेच साइड इन्कम तुम्ही देखील कमावू शकता.

if you want earn equal to salary through side income achieve to financial goal 30 percent | ५० हजार पगार आणि तेवढेच साइड इन्कम! होय, हे तुम्हीही करू शकता, जाणून घ्या कसे?

५० हजार पगार आणि तेवढेच साइड इन्कम! होय, हे तुम्हीही करू शकता, जाणून घ्या कसे?

Side Income Formula : वाढत्या महागाईत महिन्याचा पगार कधी संपतो ते कळत देखील नाही. गेल्या काही वर्षात पर्सनल लोन घेण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. यावरुन लोकांना उत्पन्न पुरत नसल्याचे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत आपले उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणे आवश्यक झाले आहे. जर तुम्हाला सांगितलं की तुमच्या पगाराव्यतिरिक्तही दर महिन्याला तेवढेच पैसे कमावू शकता. म्हणजे तुमचा पगार ५० हजार रुपये असेल तर तुम्ही साइड इन्कम ५० हजार कमावू शकता. तुम्ही खासगी नोकरीत असाल तर तुम्हाला हे गणित समजून घेणं खूप गरजेचं आहे.

पगाराव्यतिरिक्त कसे कमवायचे पैसे?
जर तुमचा मासिक पगार ५० हजार रुपये असेल आणि तुम्हाला दरमहा ५० हजार रुपये वेगळे उत्पन्न हवे असेल, तर त्यासाठी तुम्हाला दरमहा तुमच्या पगारातील किमान ३० टक्के बचत करावी लागेल. दरमहा ५० हजार रुपयांतून ३० टक्के बचत म्हणजे महिन्याला १५ हजार रुपये. आता हे पैसे म्युच्युअल फंडात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे गुंतवा. कारण येथे चांगला परतावा मिळतो. एसआयपी कॅल्क्युलेटर नुसार, जर गुंतवणूकदाराने दरमहा १५००० ची SIP केली, तर १० वर्षात सरासरी १५ टक्के परताव्यावर त्याला सुमारे ४१,७९,८५९ रुपये मिळतील.

ढोबळ शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही दर महिन्याला SIP मध्ये १५००० रुपयांची गुंतवणूक केली तर ५ वर्षांनंतर ही रक्कम सुमारे १३.५ लाख होईल. गुंतवणूकदाराने पुढील ३ वर्षांसाठी याच पद्धतीने अधिक पैसे जमा केल्यास, ८ वर्षानंतर जमा केलेले भांडवल सुमारे २८ लाख रुपयांपर्यंत वाढेल आणि १० वर्षांत ही रक्कम वाढून ४१,७९,८५९ रुपये होईल.

वाढत्या पगारासोबत गुंतवणूकही वाढवा
हे फक्त सुरुवातीच्या पगारानुसार अंदाजे आहे. बहुतेक लोकांचा पगार ७ ते ८ वर्षात दुप्पट होतो. जर पगारात वार्षिक १० टक्के वाढ झाली तर दरमहा ५० हजार रुपये कमावणाऱ्या व्यक्तीचा पगार ८ वर्षांत १ लाख रुपयांपेक्षा जास्त होईल. जर गुंतवणूकदाराने वाढत्या पगारासह गुंतवणुकीची रक्कम वाढवली, तर १० व्या वर्षी तो त्याच्या पगारातून दरमहा ३५,३६९ रुपयांची बचत करेल.

म्हणजेच, जर ५० हजार रुपये पगार असलेल्या व्यक्तीने दरमहा १५,००० रुपयांनी एसआयपी सुरू केली आणि त्यात वार्षिक १० टक्के वाढ केली, तर १०व्या वर्षी गुंतवणूकदाराची रक्कम ३५ हजार रुपये होईल. त्यानुसार १० वर्षात १५ टक्के वार्षिक परताव्यावर एकूण रक्कम ५९,३६,१२९ रुपये होईल. जर ही बचत १५ वर्षे चालू ठेवली तर एकूण १,६६,४९,९९२ रुपये मिळतील. दर महिन्याला तुमच्या पगारातील ३० टक्के बचत करून तुम्ही १० ते १५ वर्षांत किती मोठी रक्कम जमा करू शकता.
  
या फॉर्म्युल्याने जेव्हा तुम्ही तुमच्या पगाराच्या ३० टक्के रक्कम १० वर्षांसाठी गुंतवता तेव्हा तुमच्याजवळ सुमारे ६० लाख रुपये असतील. तर १.६६ कोटी रुपयांचा निधी १५ वर्षांत जमा होईल. आता कल्पना करा की ही रक्कम थेट बँकेत फिक्स डिपॉझिट (FD) म्हणून जमा केली तरी तुम्हाला दरमहा १ लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल. म्हणजेच या मार्गाने तुम्हाला तुमच्या पगाराइतके उत्पन्न मिळू लागेल.

सूचना : म्युच्युअल फंड योजना जोखमीच्या अधीन आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Web Title: if you want earn equal to salary through side income achieve to financial goal 30 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.