Lokmat Money >म्युच्युअल फंड > ५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल

५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल

SIP Calculator : म्युच्युअल फंडांमध्ये शेअर बाजाराचा धोका खूप असतो. परंतु, दीर्घकालीन गुंतवणुकीत ही जोखीम बऱ्यापैकी कमी होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 15:52 IST2025-08-24T15:50:08+5:302025-08-24T15:52:02+5:30

SIP Calculator : म्युच्युअल फंडांमध्ये शेअर बाजाराचा धोका खूप असतो. परंतु, दीर्घकालीन गुंतवणुकीत ही जोखीम बऱ्यापैकी कमी होते.

How a ₹5,000 SIP Can Help You Achieve Your Financial Goals | ५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल

५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल

SIP Calculator : देशातील म्युच्युअल फंड खात्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. केवळ खात्यांची संख्याच नाही, तर त्यातील गुंतवणूकही वेगाने वाढत आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी एसआयपी (SIP) हा एक प्रभावी आणि शिस्तबद्ध मार्ग मानला जातो. जर तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दरमहा ५,००० रुपयांची गुंतवणूक केली, तर १५ वर्षांनंतर किती मोठा फंड तयार होऊ शकतो? याचं गणित सोप्या भाषेत समजून घेऊ.

दीर्घकालीन गुंतवणुकीतून मोठा फायदा
हे लक्षात ठेवा की म्युच्युअल फंड बाजाराच्या जोखमीवर अवलंबून असतात. पण यात चक्रवाढीचा मोठा फायदा मिळतो. एसआयपी जितके जास्त काळ चालेल, तितका जास्त पैसा तुम्ही कमवू शकता.
१२% परतावा मिळाल्यास किती फंड तयार होईल?
जर तुम्हाला दरवर्षी सरासरी १२% परतावा मिळाला, तर ५,००० रुपयांच्या एसआयपीमधून १५ वर्षांत २३.७९ लाख रुपयांचा फंड तयार होऊ शकतो.
एकूण गुंतवणूक: ९ लाख रुपये (१५ वर्षे x ५,००० रुपये x १२ महिने)
अपेक्षित परतावा: १४.७९ लाख रुपये
एकूण फंड: २३.७९ लाख रुपये

१५% परतावा मिळाल्यास किती फंड मिळेल?
जर तुमच्या फंडने दरवर्षी १५% सरासरी परतावा दिला, तर १५ वर्षांत ३०.८१ लाख रुपयांचा फंड तयार होऊ शकतो.
एकूण गुंतवणूक: ९ लाख रुपये
अपेक्षित परतावा: २१.८१ लाख रुपये
एकूण फंड: ३०.८१ लाख रुपये

वाचा - ८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर

या गोष्टी लक्षात ठेवा
म्युच्युअल फंडमधील परतावा कधीही निश्चित नसतो, त्यात सतत चढ-उतार होत असतात. एसआयपीमधून मिळणाऱ्या नफ्यावर तुम्हाला 'कॅपिटल गेन्स टॅक्स' भरावा लागतो. तुमच्या फंडाचा अंतिम परतावा तुमच्या निवडलेल्या योजनेच्या कामगिरीवर अवलंबून असतो.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: How a ₹5,000 SIP Can Help You Achieve Your Financial Goals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.