SIP in Mutual Fund : दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी संध्याकाळच्या चहाचा आणि बिस्किटांचा आनंद प्रत्येकालाच हवा असतो. मात्र, तुमच्या याच सवयीतील एक छोटासा बदल तुम्हाला थेट कोट्यधीश करू शकतो, हे तुम्हाला माहित आहे का? हे ऐकायला थोडं अविश्वसनीय वाटेल, पण रोजच्या किरकोळ खर्चात बचत करून तुम्ही मोठी संपत्ती निर्माण करू शकता. गुंतवणुकीच्या जगात ही जादू घडवण्यासाठी तुम्हाला फक्त एक 'आर्थिक सवय' बदलावी लागेल.
रोज ३० रुपये वाचवा, १.१७ कोटी रुपये कमवा!
समजा, तुम्ही रोजच्या चहा-नाश्त्यावर सुमारे ३० रुपये खर्च करता. महिन्याला हा खर्च साधारणपणे ९०० रुपये होतो. जर तुम्ही ही रक्कम खर्च करण्याऐवजी सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवल्यास, दीर्घकाळात तुम्हाला प्रचंड फायदा होऊ शकतो.
हा फॉर्म्युला कसा काम करतो?
- गुंतवणुकीचा कालावधी: ४० वर्षे (उदा. ३० व्या वर्षापासून ७० व्या वर्षापर्यंत)
- मासिक SIP रक्कम: ९०० रुपये (रोज ३० रुपये बचत)
- अपेक्षित वार्षिक रिटर्न: १३% (म्युच्युअल फंडात अंदाजित)
- एकूण गुंतवणूक: ४,३२,००० रुपये (४० वर्षात)
- मिळणारी अंदाजित रक्कम: १.१७ कोटी रुपये
- याचा अर्थ, तुम्ही केवळ ४.३२ लाख रुपयांची गुंतवणूक करून १ कोटींहून अधिक संपत्ती जमा करू शकता!
कंपाउंडिंगची जादू
या गुंतवणुकीच्या यशामागे कंपाउंडिंग म्हणजेच 'व्याजावर व्याज' मिळण्याचा नियम आहे. एसआयपीची सर्वात मोठी खासियत हीच आहे की, तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल, तितका जास्त काळ तुमच्या पैशाला वाढण्यासाठी मिळतो.
तुम्ही केलेली सुरुवातीची गुंतवणूक वाढते आणि मग त्या वाढलेल्या रकमेवरही तुम्हाला व्याज मिळत राहते. यामुळे, दीर्घ कालावधीनंतर, तुम्हाला मिळालेल्या व्याजाची रक्कम मूळ गुंतवणुकीपेक्षा कितीतरी पटीने मोठी होते. म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे सरासरी १२-१५% पर्यंत रिटर्न मिळणे शक्य असते.
एसआयपीमध्ये गुंतवणूक कशी करावी?
एसआयपी म्हणजे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक सोपा आणि शिस्तबद्ध मार्ग आहे.
तुम्ही कोणत्याही विश्वसनीय गुंतवणूक प्लॅटफॉर्मवर किंवा ॲपवर (उदा. Zerodha, Groww, Kuvera, Paytm Money) आपले खाते उघडू शकता.
तुमच्या सोयीनुसार, मासिक SIP ची रक्कम (उदा. ₹९००) आणि तारीख निश्चित करा.
एकदा ऑटो-डेबिट पर्याय सुरू केल्यास, दर महिन्याला ठराविक तारखेला तुमच्या बँक खात्यातून पैसे आपोआप कट होऊन निवडलेल्या म्युच्युअल फंडात गुंतवले जातील.
टीप : म्युच्युअल फंडमधील एसआयपी ही शेअर बाजाराशी जोडलेली गुंतवणूक आहे आणि त्यात बाजारातील चढ-उतारानुसार जोखीम असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता ठेवा. कोणत्याही गुतवणुकीसाठी आर्थिक तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्या.