Top 5 Sectoral Mutual Fund Schemes : गेल्या दोन महिन्यापासून शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. सप्टेंबरमध्ये ऐतिहासिक उच्चींवर पोहचलेलं मार्केट आता निच्चांकी पातळीवर व्यवहार करत आहे. दिग्गज कंपनीचे शेअर्सही देशोधडीला लागलेत. यामध्ये गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. या परिस्थितीतही काही म्युच्युअल फंड सह्याद्रीसारखे उभे राहिले आहेत. बाजार पडत असताना या फंडांनी वर्षात ५३ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. त्यामुळे या फंडांमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल झाले आहेत.
गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. त्यानंतर, या आठवड्यात भारतीय बाजार अतिशय संथ गतीने सावरत आहे. सोमवारी बीएसई सेन्सेक्स सुमारे ४९३ अंकांच्या वाढीसह ७८,५०० च्या वर बंद झाला, तर निफ्टी सुमारे १४५ अंकांच्या वाढीसह २२,४५० च्या वर बंद झाला. पण, मंगळवारी बाजारात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. मंगळवारी BSE सेन्सेक्स सुमारे ६७ अंकांच्या घसरणीसह आणि निफ्टी सुमारे २६ अंकांच्या घसरणीसह बंद झाला.
गेल्या एका वर्षात सर्वाधिक परतावा देणाऱ्या सेक्टोरल म्युच्युअल फंड
बाजारातील या सततच्या घसरणीचा वाईट परिणाम गुंतवणूकदारांच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओवर देखील झाला आहे. मात्र, त्यातही काही म्युच्युअल फंड योजना अशाही आहेत. ज्यांनी गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ संतुलित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आपण त्या टॉप ५ सेक्टोरल म्युच्युअल फंड योजनांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी या मोठ्या घसरणीनंतरही गेल्या एका वर्षात जबरदस्त परतावा दिला आहे. यात काही म्युच्युअल फंड योजना अशाही आहेत, ज्याने गेल्या एका वर्षात ५०.३३ टक्के परतावा दिला आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या २ योजना या टॉप 5 क्षेत्रीय म्युच्युअल फंड योजनांमध्ये समाविष्ट आहेत.
Union Innovation and Opportunities Fund
AMFI डेटानुसार, युनियन इनोव्हेशन अँड अपॉर्च्युनिटीज फंडाच्या थेट योजनेने गेल्या एका वर्षात ४३.९० टक्के परतावा दिला आहे.
HDFC Defence Fund
HDFC डिफेन्स फंडाच्या डायरेक्ट प्लॅनने गेल्या १ वर्षात ४६.०३ टक्के परतावा दिला आहे.
ICICI Prudential Pharma Healthcare and Diagnostics (P.H.D) Fund
ICICI प्रुडेंशियल फार्मा हेल्थकेअर आणि डायग्नोस्टिक्स फंडाच्या डायरेक्ट प्लॅनने गेल्या १ वर्षात ४७.०९ टक्के परतावा दिला आहे.
HDFC Pharma And Healthcare Fund
HDFC फार्मा आणि हेल्थकेअर फंडाच्या थेट योजनेने गेल्या १ वर्षात ५०.३३ टक्के परतावा दिला आहे.
LIC MF Infrastructure Fund
LIC MF Infrastructure Fund च्या डायरेक्ट प्लॅनने गेल्या १ वर्षात ५३.१७ टक्के परतावा दिला आहे.