lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Mukesh Ambani News: बाबो! एका दिवसात अंबानींनी कमावले 16,765 कोटी; वॉरेन बफेंनाही टाकू शकतात मागे

Mukesh Ambani News: बाबो! एका दिवसात अंबानींनी कमावले 16,765 कोटी; वॉरेन बफेंनाही टाकू शकतात मागे

Mukesh Ambani net worth: मुकेश अंबानींच्या संपत्तीत यंदा 18.7 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी अंबानी 90 अब्ज डॉलरच्या संपत्तीमुळे जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानी आले होते. आता त्यांची संपत्ती 95.4 अब्ज डॉलर असूनही ते पहिल्या 10 मध्ये देखील नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 10:54 AM2021-09-24T10:54:22+5:302021-09-24T11:07:21+5:30

Mukesh Ambani net worth: मुकेश अंबानींच्या संपत्तीत यंदा 18.7 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी अंबानी 90 अब्ज डॉलरच्या संपत्तीमुळे जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानी आले होते. आता त्यांची संपत्ती 95.4 अब्ज डॉलर असूनही ते पहिल्या 10 मध्ये देखील नाहीत.

Mukesh Ambani News: Mukesh Ambani earned Rs 16,765 crore in one day | Mukesh Ambani News: बाबो! एका दिवसात अंबानींनी कमावले 16,765 कोटी; वॉरेन बफेंनाही टाकू शकतात मागे

Mukesh Ambani News: बाबो! एका दिवसात अंबानींनी कमावले 16,765 कोटी; वॉरेन बफेंनाही टाकू शकतात मागे

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेस अंबानी (Mukesh Ambani) यांच्या संपत्तीत गुरुवारी 2.27 अब्ज डॉलरची वाढ झाली. यामुळे Bloomberg Billionaires Index नुसार त्यांची एकूण संपत्ती 95.4 अब्ज डॉलर झाली असून ते जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत 11 व्या स्थानावर पोहोचले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरमध्ये गुरुवारी 2.43 टक्क्यांची वाढ झाली. यामुळे अंबानींच्या संपत्तीतही वाढ झाली. (Mukesh Ambani’s net worth nears $100 billion as Reliance shares surge.)

Girish Mathrubhootam: मालक असावा तर असा! आपल्या 500 कर्मचाऱ्यांना करोडपती केले, अपार कष्ट झेलले

मुकेश अंबानींच्या संपत्तीत यंदा 18.7 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी अंबानी 90 अब्ज डॉलरच्या संपत्तीमुळे जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानी आले होते. आता त्यांची संपत्ती 95.4 अब्ज डॉलर असूनही ते पहिल्या 10 मध्ये देखील नाहीत. जगातील पहिल्या 10 श्रीमंतांची संपत्ती ही 100 अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. 10 व्या क्रमांकावर जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे (Warren Buffett) हे आहेत. त्यांची संपत्ती 101 अब्ज डॉलर असून मुकेश अंबानींपेक्षा 5.6 अब्ज डॉलर कमी आहे. 

Evergrande crisis: एव्हरग्रँड संकट! हाहाकार, जगातील अब्जाधीशांचे एकाच दिवसात 10 लाख कोटी बुडाले

या यादीत अदानी ग्रुपचे (Adani Group) चेअरमन गौतम अदानी (Gautam Adani) 68.5 अब्ज डॉलरच्या संपत्तीद्वारे 14 व्या नंबरवर आहेत. अंबानींनंतर आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत ते आहेत. अंबानी आणि अदानींच्या मध्ये जगातील सर्वात श्रीमंत महिला फांस्वाज बेटनकोर्ट मायर्स (Francoise Bettencourt Meyers) 12 व्या नंबरवर आणि 13 व्या नंबरवर स्पेनच्या अमेंशिया ओर्टेगा (Amancio Ortega) या आहेत. 

Web Title: Mukesh Ambani News: Mukesh Ambani earned Rs 16,765 crore in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.