Mukesh Ambani builds world's largest zoo; Likely to start in 2023 | मुकेश अंबानी उभारतायत जगातील सर्वात मोठं प्राणी संग्रहालय; २०२३ मध्ये सुरु होण्याची शक्यता 

मुकेश अंबानी उभारतायत जगातील सर्वात मोठं प्राणी संग्रहालय; २०२३ मध्ये सुरु होण्याची शक्यता 

ठळक मुद्देअंबानी यांची नेट वर्थ ८० अब्ज डॉलर्स इतकं आहे.अंबानी भारतात उभारतायत जगातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी हे जगातील सर्वात मोठ्या प्राणी संग्रहालयाची उभारणी भारतात करत आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार मुकेश अंबानी गुजरातमध्ये हे प्राणी संग्रहालय उभारणार आहे. या ठिकाणी त्यांचा समूहमार्फत तेल शुद्धीकरणाचा मोठा प्रकल्पही सुरू आहे. रिलायन्स समुहातील कॉर्पोरेट अफेअर्सचे अध्यक्ष पिरामल नाथवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्राणी संग्रहालय २०२३ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. यामध्ये स्थानिक सरकारच्या मदतीसाठी रेस्क्यू सेंटरदेखील असणार आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार रिलायन्सच्या प्रतिनिधींनी या प्रकल्पाची किंमत आणि अन्य कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. अंबानी यांची नेट वर्थ ८० अब्ज डॉलर्स इतकं आहे. यामध्ये त्यांचा टेक पासून ई-कॉमर्समधील व्यवसायाचा समावेश आहे. तर दुसरीकडे ते आयपीएलमध्ये खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स या संघाचेही मालक आहेत. त्यांनी आपलं लक्ष हे सार्वजनिक व्हेंचर्सवरही वाढवलं आहे. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या २०१९ मध्ये न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलियन म्युझिअम ऑफ आर्टच संचालक मंडळात सामील झाल्या होत्या.

त्यांच्याकडे आर्थिक ताकद

Campden वेल्थच्या डायरेक्टर ऑफ रिसर्च रिबेका गूच यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे कल्पनाशक्तीला सत्त्यात उतरवण्यासाठी आर्थिक ताकद आहे. त्यांनी अब्जाधीश अशा प्रकल्पांमध्ये का गुंतवणूक करतात यावरही भाष्य केलं. सार्वजनिक ठिकाणी करण्यात येणाऱ्या गुंतवणूकीमुळे कुटुंब आणि कंपनी दोन्हींची प्रतीमा उंचावण्यास मदत मिळते. यामुळे नफा आणि काही नकारात्मक गोष्टी कमी करण्यासही मदत मिळते. यामुळे समाजात त्या व्यक्तीची प्रतिष्ठा चांगली होते आणि भविष्यासाठीही ते उत्तम असतं असं त्यांनी नमूद केलं.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mukesh Ambani builds world's largest zoo; Likely to start in 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.