Modi government gives big relief to 8 crore 70 lakh farmers vrd | ८ कोटी ७० लाख शेतकऱ्यांना मोदी सरकारचा मोठा दिलासा

८ कोटी ७० लाख शेतकऱ्यांना मोदी सरकारचा मोठा दिलासा

नवी दिल्लीः कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असून, रुग्णांची संख्याही वाढतीच आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे. त्यातच आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोठ्या घोषणा केल्या आहे. विशेष म्हणजे गोरगरिबांबरोबर शेतकऱ्यांनाही मोदी सरकारनं भरपूर काही दिलं आहे. मोदी सरकार ८ कोटी ७० लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात तात्काळ दोन हजार रुपये टाकणार आहे, अशी घोषणाच निर्मला सीतारामण यांनी केली आहे.  जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याची माहिती दिली.

एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात २०००-२००० रुपये जमा केले जाणार आहेत. किसान सन्मान निधी योजनेंतर्गत हा निधी दिला जाणार असून, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. याचा थेट ८ कोटी ७० लाख शेतकऱ्यांना फायदा पोहोचणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच दोन हजार रुपयांचा हप्ता वळता केला जाणार आहे. निर्मला सीतारामन म्हणाल्या, देशातील ८ कोटी ७० लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून आर्थिक देण्यात येणार असून, या योजनेच्या माध्यमातून सरकारची शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याची तरतूद आहे. त्यातून पहिला हप्ता दोन हजार रुपये तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकला जाणार आहे.

कोरोनाचं थैमान रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी घेतलेला लॉकडाउनचा निर्णय योग्यच असला तरी रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूर कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत.  त्यांना दिलासा देण्याचाही या पॅकेजच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला आहे. गोरगरिबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Modi government gives big relief to 8 crore 70 lakh farmers vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.