Maruti Suzuki hikes price of selected models by up to Rupees 22500 | Maruti Suzuki चा ग्राहकांना झटका; 'या' कार्सच्या किंमतीत केली मोठी वाढ

Maruti Suzuki चा ग्राहकांना झटका; 'या' कार्सच्या किंमतीत केली मोठी वाढ

ठळक मुद्देकंपनीनं एप्रिल महिन्यापासून गाड्यांच्या किंमती वाढवण्याची केली होती घोषणा.नव्या किंमती शुक्रवारपासूनच (१६ एप्रिल) लागू.

देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारूती सुझुकीनं ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कंपनीनं तात्काळ प्रभावानं आपल्या काही गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मारूती सुझुकीच्या काही गाड्यांच्या किंमतीत २२ हजार ५०० रूपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ होत असल्यानं काही मॉडेल्सच्या किंमती वाढवण्यात आल्याचं कंपनीनं शुक्रवारी सांगितलं.
 
"कच्च्या मालाच्या किंमतीत होत असलेल्या वाढीमुळे काही गाड्यांच्या किंमती वाढवाव्या लागत आहेत," असं कंपनीनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितलं. कंपनीनं सेलेरियो आणि स्विफ्ट सोडून सर्वच गाड्यांच्या किंमती वाढवल्या आहेत. 

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार नव्या किंमती शुक्रवारपासूनच तात्काळ प्रभावानं लागू झाल्या आहेत. यानंतर दिल्लीतील शोरूम्समध्ये अनेक गाड्यांच्या किंमतीत १.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनी भारतीय बाजारपेठेत ऑल्टोपासून एस क्रॉसपर्यंत अनेक मॉडेल्सची विक्री करते. यापूर्वी कंपनीनं १८ जानेवारी रोजी काही गाड्यांच्या किंमतीत ३४ हजार रूपयांनी वाढ करण्याची घोषणा केली होती.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maruti Suzuki hikes price of selected models by up to Rupees 22500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.