Lokmat Money > बिझनेस न्यूज > युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला

युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला

युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल करणाऱ्या ३ जणांवर सेबीनं मोठी कारवाई केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 10:20 IST2025-05-01T10:19:27+5:302025-05-01T10:20:50+5:30

युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल करणाऱ्या ३ जणांवर सेबीनं मोठी कारवाई केली आहे.

Investors mislead through YouTube SEBI takes major action Advice given on investing in shares | युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला

युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला

युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल करणाऱ्या ३ जणांवर सेबीनं मोठी कारवाई केली आहे. बुधवारी मनीष मिश्रा, विवेक चौहान आणि अंकुर शर्मा यांच्यावर शेअर बाजारातून ५ वर्षांची बंदी घालण्यात आली. अटलांटा लिमिटेडच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओद्वारे गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. ऑनलाइन गुंतवणूकदारांची दिशाभूल करणाऱ्यांविरोधात सेबीनं घेतलेल्या कठोर भूमिकेअंतर्गत हे पाऊल उचलण्यात आलंय.

कोणावर काय कारवाई केली?

सेबीने मनीष मिश्राला ५० लाख रुपये, विवेक चौहान आणि अंकुर शर्मा यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. मिश्रा आणि शर्मा यांना १०.३८ लाख रुपयांचा बेकायदेशीर नफा, इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडात (आयपीईएफ) जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम

युट्यूब चॅनल्सचा गैरवापर

मनीष मिश्रानं MIDCAP CALLS आणि Profit Yatra नावाच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवून गुंतवणूकदारांना अटलांटाचे शेअर्स खरेदी करण्यास प्रवृत्त केलं. मनीष मिश्रानं ४.३७ लाख आणि अंकुर शर्मान ६.०१ लाख रुपये चुकीच्या पद्धतीनं कमावल्याचं सेबीला आढळलं. या व्यक्तींनी पीएफयूटीपी (फ्रॉड अँड अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस) नियमांचं उल्लंघन केल्याचं सेबीनं म्हटलं. मिश्रा आणि चौहान हे यापूर्वीही अशाच प्रकारच्या प्रकरणांमध्ये सामील होते. सेबीने ते बाजाराच्या न्याय्य नियमांच्या विरोधात काम करणारं असल्याचं म्हटलं.

यापूर्वीही कारवाई

सेबीनं ऑगस्ट २०२२ ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान अटलांटा लिमिटेडच्या शेअर्समधील असामान्य व्यवहारांची चौकशी केली होती. या घडामोडींबाबत नॅशनल स्टॉक एक्स्चेंजनं (एनएसई) सेबीला सतर्क केले होते. यापूर्वी सेबीनं साधना ब्रॉडकास्ट, शार्पलाइन ब्रॉडकास्ट अँड प्रेशर सेन्सिटिव्ह सिस्टिम्स (इंडिया) लिमिटेडच्या प्रकरणात मिश्रा आणि चौहान यांच्यावर निर्बंध लादले होते.

Web Title: Investors mislead through YouTube SEBI takes major action Advice given on investing in shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.