Term Insurance Plan : धावपळीच्या जीवनात कधी कोणाला काय होईल काही सांगता येत नाही. अशा स्थितीत जर तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्या कमाईवर अवलंबून असतील, तर त्यांची आर्थिक सुरक्षा केवळ आशेवर नाही, तर एका चांगल्या टर्म इन्शुरन्स प्लानवर अवलंबून असते. टर्म इन्शुरन्स हा पैसा वाढवणारी गुंतवणूक नसून, तो एक असे सुरक्षा कवच आहे जे तुमच्या पश्चात कुटुंबाला आर्थिक आधार देते.
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या १० ते १५ पट रकमेचा जीवन विमा घेणे आवश्यक आहे आणि पॉलिसीचा कालावधीही जास्तीत जास्त असावा. अशा परिस्थितीत बाजारात उपलब्ध असलेल्या शेकडो योजनांमधून योग्य योजना निवडणे कठीण असते. तुमच्या सोयीसाठी, ३० वर्षांपर्यंतच्या तरुणांसाठी उपलब्ध असलेल्या सर्वात परवडणाऱ्या टर्म इन्शुरन्स योजनांची यादी तयार केली आहे.
सर्वात कमी प्रीमियम असलेल्या टर्म प्लान्सची यादी
या यादीत १ कोटी रुपयांच्या विम्यासाठी एका ३० वर्षीय पुरुषाला (पुरुष, धूम्रपान न करणारा, ३० वर्षांसाठी पॉलिसी) भरावा लागणारा अंदाजित वार्षिक प्रीमियम दाखवला आहे.
| विमा कंपनी | प्लानचे नाव | वार्षिक प्रीमियम (₹) |
| बजाज आलियान्ज | बजाज आलियान्ज लाइफ eTouch II | ८,५३५ |
| अॅक्सिस मॅक्स | स्मार्ट टर्म प्लान प्लस | ८,७६० |
| आदित्य बिर्ला कॅपिटल | सुपर टर्म प्लान | ८,९६८ |
| टाटा AIA | संपूर्ण रक्षा प्रॉमिस | ९,०३५ |
| बंधन लाइफ | iTerm प्राइम | ९,१६३ |
| आयसीआयसीआय प्रुडेंशियल | iProtect स्मार्ट प्लस | ९,४०४ |
| केनरा HSBC लाइफ | यंग टर्म प्लान – लाइफ सिक्योर | ९,५८२ |
| कोटक लाइफ | कोटक e-टर्म | ९,६०० |
| एडेलवाइस लाइफ | जिंदगी प्रोटेक्ट प्लस | ९,७६७ |
| एचडीएफसी लाइफ | क्लिक 2 प्रोटेक्ट सुपर सुप्रीम | १०,५४३ |
| अवीवा लाइफ | सिग्नेचर 3D टर्म प्लान – प्लेटिनम | १०,६३१ |
| एसबीआय लाइफ | eShield नेक्स्ट | ११,२६६ |
टर्म प्लान निवडताना काय लक्षात घ्यावे?
- तुमच्या सवयी आणि जीवनशैलीच्या गरजा.
- तुमच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती आणि त्यांचे भविष्य.
- मुलांचे शिक्षण, लग्न किंवा इतर मोठे आर्थिक उद्दिष्ट्ये.
वाचा - कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
टर्म इन्शुरन्स हा खर्च नसून, तुमच्या कुटुंबासाठी एक मजबूत आर्थिक संरक्षण आहे. तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार योग्य प्लान निवडा आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करा.
