Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >विमा > फक्त १२ रुपये प्रति दिन दरात मिळवा ३ लाखांचा आरोग्य विमा; PhonePe ची मोठी घोषणा, काय आहेत फायदे?

फक्त १२ रुपये प्रति दिन दरात मिळवा ३ लाखांचा आरोग्य विमा; PhonePe ची मोठी घोषणा, काय आहेत फायदे?

Health Insurance: कंपनीने दररोज फक्त १२ रुपये या किमतीत एक नवीन ग्रुप हेल्थ कव्हर लाँच केले आहे. यामध्ये ३ लाख रुपये हॉस्पिटल कव्हरपासून ते डॉक्टरांचा सल्ला आणि हॉस्पिटल कॅशपर्यंत अनेक फायदे समाविष्ट आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:57 IST2025-11-27T15:28:47+5:302025-11-27T15:57:30+5:30

Health Insurance: कंपनीने दररोज फक्त १२ रुपये या किमतीत एक नवीन ग्रुप हेल्थ कव्हर लाँच केले आहे. यामध्ये ३ लाख रुपये हॉस्पिटल कव्हरपासून ते डॉक्टरांचा सल्ला आणि हॉस्पिटल कॅशपर्यंत अनेक फायदे समाविष्ट आहेत.

PhonePe and HDFC ERGO Launch ₹3 Lakh Group Health Cover for Gig Workers, Starts at Just ₹12/Day | फक्त १२ रुपये प्रति दिन दरात मिळवा ३ लाखांचा आरोग्य विमा; PhonePe ची मोठी घोषणा, काय आहेत फायदे?

फक्त १२ रुपये प्रति दिन दरात मिळवा ३ लाखांचा आरोग्य विमा; PhonePe ची मोठी घोषणा, काय आहेत फायदे?

Health Insurance : दिवसेंदिवस वैद्यकीय उपचार महाग होत चालले आहेत. असे असताना देशातील अनेक कुटुंबांकडे, विशेषत: गिग वर्कर्स, लहान व्यावसायिक आणि निम्न व मध्यम उत्पन्न गटातील लोकांकडे, आरोग्य विमा नाही. याच समस्येवर मात करण्यासाठी फोनपेने एचडीएफसी ईआरजीओ सोबत भागीदारी करत 'सुरक्षा संकल्प फॉर भारत' कार्यक्रमांतर्गत एक नवीन ग्रुप हेल्थ कव्हर लॉन्च केले आहे. हा प्लान पूर्णपणे डिजिटल असून, त्याची किंमत जवळपास १२ रुपये प्रतिदिन इतक्या कमी दरात सुरू होते.

कमी खर्चात ३ लाख रुपयांचे कव्हर
हा प्लान आरोग्य विम्यापासून वंचित असलेल्या मोठ्या लोकसंख्येला परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतो. या योजनेत जवळपास १२ रुपये प्रतिदिन (₹४,३८० वार्षिक) पासून प्रीमियम सुरू होतो. रुग्णालयात दाखल झाल्यास ३ लाख रुपयांपर्यंतचे कव्हर मिळते. नेटवर्क रुग्णालयांमध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे.

इतर लाभ

  • डॉक्टर कन्सल्टेशन: फिजिकल डॉक्टर कन्सल्टेशनसाठी २,००० रुपये पर्यंतचा लाभ आणि अमर्यादित ऑनलाइन डॉक्टर ॲक्सेस.
  • वैयक्तिक अपघात कव्हर : समाविष्ट आहे.
  • हॉस्पिटल कॅश बेनिफिट: प्रतिदिन २,००० रुपयेपर्यंत (जास्तीत जास्त १५ दिवसांसाठी).
  • वेक्टर बॉर्न डिजीज : डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांसाठी प्रतिदिन १,५०० रुपये पर्यंत (जास्तीत जास्त १० दिवसांसाठी).
  • कंझ्युमेबल आयटम्स: सिरिंज आणि बँडेज यांसारख्या उपभोग्य वस्तूंचा खर्चही कव्हरमध्ये समाविष्ट आहे.

१२ रुपये प्रतिदिन वाला प्लान कसा खरेदी कराल?

  • PhonePe ॲप उघडून होम स्क्रीनवरील 'Insurance' चा पर्याय निवडा.
  • आरोग्य विमा निवडा : त्यानंतर 'Health Insurance' वर जा.
  • कव्हरेज निवडा : तुम्हाला कोणासाठी कव्हरेज हवे आहे, हे निवडा (उदा. स्वतः, जोडीदार, मुले, पालक इ.).
  • 'Find Plans' वर क्लिक करून ३ लाख रुपये सम इन्श्युअर्ड असलेला पर्याय निवडा.
  • येथे तुम्हाला 'HDFC ERGO GHI Suraksha Sankalp' हा प्लान दिसेल.
  • प्रीमियम आणि फीचर्स तपासल्यानंतर 'Buy Plan' वर टॅप करून पेमेंट करा.

वाचा - Jio-BlackRock ची म्युच्युअल फंडात धमाकेदार एंट्री! सेबीची ४ नव्या फंडांना मंजुरी; गुंतवणूकदारांना मोठी संधी

पेमेंटनंतर पॉलिसी त्वरित सक्रिय होते आणि 'My Policies' सेक्शनमध्ये उपलब्ध होते. PhonePe चा हा उपक्रम आरोग्य विम्यापासून वंचित असलेल्या मोठ्या वर्गाला सुरक्षा प्रदान करेल.

Web Title: PhonePe and HDFC ERGO Launch ₹3 Lakh Group Health Cover for Gig Workers, Starts at Just ₹12/Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.