Lokmat Money >आयकर > जुनी की नवीन? तुमच्यासाठी कोणती करप्रणाली अधिक फायदेशीर? तज्ज्ञांनी दिलं उत्तर

जुनी की नवीन? तुमच्यासाठी कोणती करप्रणाली अधिक फायदेशीर? तज्ज्ञांनी दिलं उत्तर

Old Tax Regime : गेल्या वर्षीपासून आयकर विभागाने नवीन कर प्रणाली लागू केली आहे. मात्र, अजूनही अर्थतज्ज्ञ जुनी कर प्रणाली अधिक चांगली असल्याचं सांगत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 13:45 IST2025-01-10T13:45:16+5:302025-01-10T13:45:54+5:30

Old Tax Regime : गेल्या वर्षीपासून आयकर विभागाने नवीन कर प्रणाली लागू केली आहे. मात्र, अजूनही अर्थतज्ज्ञ जुनी कर प्रणाली अधिक चांगली असल्याचं सांगत आहेत.

why will not old tax regime closed know benefits other details | जुनी की नवीन? तुमच्यासाठी कोणती करप्रणाली अधिक फायदेशीर? तज्ज्ञांनी दिलं उत्तर

जुनी की नवीन? तुमच्यासाठी कोणती करप्रणाली अधिक फायदेशीर? तज्ज्ञांनी दिलं उत्तर

Old Tax Regime : गेल्या वर्षी आयकर विभागाने नवीन करप्रणाली लागू केली. यानंतर बहुतांश करदात्यांचा  जुन्या करप्रणालीकडे कल कमी झाला आहे. कारण नवीन कर प्रणालीनुसार, ७ लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. काही लोक असेही म्हणतात की जुनी कर व्यवस्था बंद केली जाऊ शकते. मात्र, कर तज्ज्ञ जुनी करप्रणाली कायम ठेवण्याचा आग्रह धरत आहेत. त्यांनी मागचे फायदेही सांगितले आहेत.

जुनी कर व्यवस्था रद्द केली जाऊ नये, असं मत इकॉनॉमिक लॉ प्रॅक्टिसचे भागीदार दीपेश जैन यांनी मांडले आहे. ही करप्रणाली अजूनही करदात्यांना विशिष्ट उत्पन्न पातळीपर्यंत कपातीचा लाभ देत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सोप्या भाषेत हे समजून घेऊ.

समजा ३० वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर योगेश नागपूरहून पुण्याला काम करण्यासाठी आला आहे. तो महिन्याला २५ हजार रुपये घरभाडे देतो. सोबतच भविष्य निर्वाह निधीमध्येही त्याची नियमितपणे गुंतवणूक सुरू आहे. जुन्या कर प्रणाली अंतर्गत, तो घरभाडे आणि त्याच्या पीएफ गुंतवणुकीवरील कपातीवर HRA लाभांचा दावा करू शकतो. नवीन कर प्रणालीमध्ये ही सूट उपलब्ध नाही.

जैन यांच्या मते, नवीन करप्रणाली लागू झाल्यानंतर जुनी करप्रणाली संपुष्टात येईल, असे अजिबात नाही. ते म्हणाले की नवीन कर प्रणाली अंतर्गत कमी दर आणि उत्पन्नाच्या स्लॅबमध्ये बदल असूनही, जुनी कर व्यवस्था अजूनही करदात्यांमध्ये लोकप्रिय आहे. यात घरभाडे भत्ता (HRA), गृहकर्जावरील व्याज आणि इतर काही कपातीचा लाभ घेऊ शकतो. जे नवीन कर प्रणालीमध्ये उपलब्ध नाहीत.

उदाहरणार्थ, ३२ वर्षांची निकिता एक शिक्षिका आहे, जिने नुकतेच कर्ज घेऊन तिचे पहिले घर विकत घेतले आहे. जुन्या कर प्रणाली अंतर्गत, ती तिच्या गृहकर्जावरील व्याज आणि मुलांच्या शैक्षणिक कर्जावर वजावटीचा दावा करू शकते. नवीन कर प्रणालीमध्ये असा लाभ दिला जात नाही.

जुन्या कर व्यवस्था कोणी वापरावी?
ज्यांना गुंतवणूक आणि कर्जावरील कपातीचा लाभ घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी हे अधिक योग्य मानले जाते. करदात्यांना जुन्या कर प्रणाली अंतर्गत सूट किंवा लाभ मिळतो. तो नवीन कर प्रणालीमध्ये उपलब्ध नाही. तुम्हाला ही सूट घ्यायची नसेल किंवा कमी उत्पन्न असेल तर तुम्ही नवीन कर प्रणाली निवडू शकता.

विविध प्रकारच्या गुंतवणूक, गृहकर्ज आणि इतर सवलतींद्वारे, जुन्या कर प्रणाली अंतर्गत १० ते १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर एकही रुपया कर भरावा लागत नाही. अशा वेळी या करदात्यांना नवीन प्रणालीपेक्षा जुनी कर प्रणाली अधिक न्याय्य मानली जाते.

काय क्लेम करू शकतो?
जैन म्हणाले, “काही करदात्यांना नवीन कर प्रणालीपेक्षा जुनी कर व्यवस्था निवडण्याचा एक फायदा आहे, कारण त्यांना नवीन कर प्रणाली अंतर्गत उपलब्ध कपातीचा लाभ मिळतो, जसे की घर भाडे भत्ता (HRA), कलम 80C. (पीएफ, ईएलएसएस, पीपीएफ), गृहकर्जावरील व्याज, वैद्यकीय विमा, शैक्षणिक कर्जावरील व्याज इत्यादीची वजावट."

Web Title: why will not old tax regime closed know benefits other details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.