Lokmat Money >आयकर > नवविवाहितांना हनिमूनऐवजी आयकर कार्यालयात माराव्या लागणार चकरा? तुम्हालाही येऊ शकते नोटीस

नवविवाहितांना हनिमूनऐवजी आयकर कार्यालयात माराव्या लागणार चकरा? तुम्हालाही येऊ शकते नोटीस

Lavish Wedding Expenses: गेल्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेली अनेक विवाह सोहळे आता आयकर विभागच्या रडावर आले आहेत. जोडप्यांना हनिमून सोडून आयकर कार्यालयात खेट्या मारव्या लागत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 14:29 IST2024-12-20T14:26:39+5:302024-12-20T14:29:58+5:30

Lavish Wedding Expenses: गेल्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेली अनेक विवाह सोहळे आता आयकर विभागच्या रडावर आले आहेत. जोडप्यांना हनिमून सोडून आयकर कार्यालयात खेट्या मारव्या लागत आहेत.

lavish wedding now on it radar as tax department investigates 7500 crore of unaccounted cash expenses in wedding | नवविवाहितांना हनिमूनऐवजी आयकर कार्यालयात माराव्या लागणार चकरा? तुम्हालाही येऊ शकते नोटीस

नवविवाहितांना हनिमूनऐवजी आयकर कार्यालयात माराव्या लागणार चकरा? तुम्हालाही येऊ शकते नोटीस

Lavish Wedding Under IT Scanner : तुळशीच्या लग्नानंतर देशभरात लगीनसराई सुरू झाली आहे. २०२४ वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. मागच्या २ महिन्यात हजारो तरुण-तरुणी बोहल्यावर चढल्या आहेत. गुलाबी थंडीत बहुतेक जोडपी आता हनिमूनला जाण्याच्या तयारीत असतील. मात्र, काही जोडप्यांना लोणावळा-खंडाळा ऐवजी आयकर विभागातील कार्यालयात चकरा मारव्या लागणार आहेत. गेल्या नोव्हेंबर आणि डिसेंबर या २ महिन्यांत देशातील विविध शहरांमध्ये भव्य विवाहसोहळ्यात कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही लग्ने आता कर विभागाच्या रडारवर आली आहेत. यात बॉलिवूड कलाकार आणि सेलिब्रिटींनी सहभाग घेतलेल्या लग्नांचाही समावेश आहे.

लग्नसराईत ७५०० कोटींचा हिशेब नाही
ईटीच्या रिपोर्टनुसार, आयकर विभागाने जयपूरमधील २० वेडिंग प्लॅनर्सच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. गेल्या वर्षभरात या भव्य विवाहसोहळ्यांवर ७५०० कोटी रुपये रोख खर्च झाल्याचा आयकर विभागाचा संशय आहे, ज्याचा हिशेबच नाही. यामध्ये सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवण्यात आल्याचा संशय आहे. यामागे एक मोठी टोळी कार्यरत असल्याचेही समोर आले आहे. यात खोटी बिले, हवाला एजंट आणि मनी म्यूल अकाउंट चालवणाऱ्यांचा समावेश आहे. ही टोळी हैदराबाद आणि बेंगळुरू येथील भागीदारांच्या सहकार्याने चालवली जाते. यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय केला जात आहे. 

डेस्टिनेशन वेडिंग देखील रडारलर
जर तुम्ही देखील डेस्टिनेशन वेडिंग केले असेल तर तुम्हालाही आयकर विभागाची नोटीस येऊ शकते. डेस्टिनेशन वेडिंग देखील आयकरच्या रडारवर असून विभागाने अनेक ठिकाणी छापे देखील टाकले आहेत. या छाप्यादरम्यान आयकर विभागाने रोखीने केलेले व्यवहार शोधून काढेल. ज्यामध्ये लग्नाच्या खर्चापैकी ५० ते ६० टक्के रक्कम रोखीने दिली जाते. त्याचबरोबर ज्या लग्नांमध्ये बॉलीवूड स्टार्सना चार्टर्ड प्लेनने बोलावण्यात आले होते, तेही टार्गेटवर आहेत.

मोठी साखळी कार्यरत
लग्नाच्या पाहुण्यांची यादी आणि सोहळा किती मोठा होता यावरुन आयकर विभाग विवाहांवर झालेल्या खर्चाच्या हिशोबाचा तपास करणार आहे. या संदर्भात केटरिंग कंपन्यांचीही चौकशी केली जात आहे. आतापर्यंतच्या प्राप्तिकर तपासणीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. लक्झरी वेडिंग क्लायंट हाय-प्रोफाइल इव्हेंट आयोजकांशी संपर्क साधतात. हे लोक मग राजस्थानमधील इव्हेंट नियोजकांशी थेट संपर्क करतात. जे लग्नाचे नियोजन करण्यासाठी लक्झरी हॉटेल, टेंट हाऊस, केटरर्स, फ्लोरिस्ट आणि सेलिब्रिटी मॅनेजर यांच्याशी समन्वय साधतात. अशा प्रकारे ही एक मोठी साखळी यात काम करत आहे.
 

Web Title: lavish wedding now on it radar as tax department investigates 7500 crore of unaccounted cash expenses in wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.