Lokmat Money > बिझनेस न्यूज > '...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा

'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा

Donald Trump iPhone India News: भारतात आयफोन निर्मितीच्या हालचाली सुरू असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांना टॅरिफ अस्त्र उपसण्याचा इशारा दिला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 18:22 IST2025-05-23T18:21:08+5:302025-05-23T18:22:58+5:30

Donald Trump iPhone India News: भारतात आयफोन निर्मितीच्या हालचाली सुरू असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांना टॅरिफ अस्त्र उपसण्याचा इशारा दिला आहे. 

if Apple are made outside the US then there will be a 25 percent tariff on iPhone', Trump's blunder in iPhone manufacturing in India, warning to Tim Cook | '...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा

'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा

Donald Trump Opposed to Iphone Making in India: 'मी टिम कुक यांना आधीच सांगितलेलं आहे की, अमेरिकेत विकले जाणार आयफोन हे इथेच तयार झालेले असले पाहिजेत, नाहीतर २५ टक्के टॅरिफ द्यावा लागेल', असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांना दिला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भारतात आयफोन निर्मिती करण्याच्या ॲपलच्या अडचणी वाढताना दिसत आहे. कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडूनच याला विरोध होऊ लागला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी टिम कुक यांनी भारतात भारतात आयफोन निर्मित करू नका असे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता टॅरिफचे अस्त्र उपसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

...तर डोनाल्ड ट्रम्प आयफोनवर लावणार २५ टक्के टॅरिफ

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल ट्रूथ या सोशल मीडियावर पोस्ट करून याबद्दलची माहिती दिली. 

"मी ॲपलचे सीईओ टिम कुक यांना खूप आधीच सांगितले होते की, जर त्यांचे आयफोन जे अमेरिकेत विकले जातील. ते अमेरिकेमध्येच तयार झाले पाहिजेत, ना भारतात किंवा इतर देशामध्ये. जर असे झाले नाही, तर अमेरिकेमध्ये ॲपलला कमीत कमी २५ टक्के टॅरिफ द्यावा लागेल", असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी टिम कुक आणि ॲपलला दिला आहे. 

वाचा >>२५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य

ॲपल, ट्रम्प आणि टॅरिफ हे प्रकरण मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली, तेव्हा ॲपलसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. 

हे टाळण्यासाठी ॲपलने आपले निर्मिती प्रकल्प भारत किंवा इतर देशामध्ये स्थलांतरित करण्याच्या तयारीत आहे. पण, ट्रम्प यांची इच्छा आहे की, ॲपलने अमेरिकेमध्येच आयफोन्सची निर्मिती करावी. त्यातून आता ट्रम्प यांनी २५ टक्के टॅरिफ लागू करण्याचा इशारा दिला आहे. 

Web Title: if Apple are made outside the US then there will be a 25 percent tariff on iPhone', Trump's blunder in iPhone manufacturing in India, warning to Tim Cook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.