Hyundai Motor india share: ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडच्या शेअर्सनी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. बुधवारी, आठवड्याच्या तिसऱ्या ट्रेडिंग दिवशी, या कंपनीच्या शेअरमध्ये ३% वाढ झाली आणि किंमत २१४५ रुपयांवर पोहोचली. हा स्टॉकचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. गेल्या चार ट्रेडिंग सत्रांपैकी तीन सत्रांमध्ये या शेअरमध्ये वाढ झाली आहे. गेल्या चार ट्रेडिंग सत्रांमध्ये या शेअरमध्ये ११% वाढ झाली.
गेल्या वर्षी आलेला आयपीओ
ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडच्या आयपीओबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या वर्षी स्टॉक शेअर बाजारात लिस्ट झाला होता. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ आहे. आयपीओची इश्यू प्राईज ₹१९६० होती, हा स्टॉक सध्या १०% प्रीमियमवर आहे.
सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
काय म्हटलंय ब्रोकरेजनं
ब्रोकरेज फर्म एवेंडस स्पार्कन या स्टॉकवर कव्हरेज सुरू केलंय. ब्रोकरेजनं या स्टॉकसाठी "बाय" रेटिंग दिलं आहे आणि ₹२३५० ची टार्गेट दिलं आहे. जी सध्याच्या पातळीपेक्षा आणखी वाढ दर्शवतं. नोमुराने ह्युंदाई मोटर इंडियासाठी ₹२२९१ च्या टार्गेटसह "बाय" करण्याची शिफारस देखील कायम ठेवली आहे. ह्युंदाई मोटर इंडिया कव्हर करणाऱ्या २४ तज्ज्ञांपैकी २० जणांनी या स्टॉकला "बाय" रेटिंग दिलंय. त्याच वेळी, तिघांनी "होल्ड" करण्याचा सल्ला दिला आहे आणि एकानं सेल रेटिंग दिलं आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)