Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्राप्तीकर रिटर्न भरताय? 'या' ३ महत्त्वाच्या फॉर्मशिवाय होणार नाही काम! आताच तपासा!

प्राप्तीकर रिटर्न भरताय? 'या' ३ महत्त्वाच्या फॉर्मशिवाय होणार नाही काम! आताच तपासा!

Income Tax Return : तुम्ही जर अद्याप प्राप्तीकर परतावा भरला नसेल तर तुम्हाला ३ कागपत्रांची माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:24 IST2025-06-11T15:12:22+5:302025-06-11T15:24:01+5:30

Income Tax Return : तुम्ही जर अद्याप प्राप्तीकर परतावा भरला नसेल तर तुम्हाला ३ कागपत्रांची माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता.

Guide to ITR Filing Understanding Form 16, 26AS, and AIS for Taxpayers | प्राप्तीकर रिटर्न भरताय? 'या' ३ महत्त्वाच्या फॉर्मशिवाय होणार नाही काम! आताच तपासा!

प्राप्तीकर रिटर्न भरताय? 'या' ३ महत्त्वाच्या फॉर्मशिवाय होणार नाही काम! आताच तपासा!

Income Tax Return : प्राप्तीकर भरण्यास सुरुवात झाली असून प्रत्येकजण या कामात व्यग्र आहे. तुम्हीही यापैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आयकर रिटर्न योग्यरित्या भरण्यासाठी आणि कोणतीही चूक होऊ नये म्हणून काही गोष्टींची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या पगाराव्यतिरिक्त, इतर उत्पन्नाची आणि खर्चाची माहिती देण्यासाठी तुम्हाला ३ महत्त्वाच्या फॉर्मबद्दल माहित असणे आवश्यक आहे. हे फॉर्म म्हणजे फॉर्म १६, फॉर्म २६ AS आणि वार्षिक माहिती विवरण (Annual Information Statement - AIS).

फॉर्म १६ म्हणजे पगाराचा सातबारा
फॉर्म १६ हा पगारदार व्यक्तींसाठी खूप महत्त्वाचा असतो. तुमच्या नियोक्ता कंपनीकडून (जिथे तुम्ही काम करता) प्रत्येक आर्थिक वर्ष संपल्यानंतर, १५ जून रोजी किंवा त्यापूर्वी हा फॉर्म दिला जातो. यात तुम्हाला वर्षभरात पगारापोटी किती रक्कम मिळाली आणि तुमच्या पगारातून किती टीडीएस (Tax Deducted at Source) कापला गेला, याची संपूर्ण माहिती असते. याशिवाय, कंपनीने कापलेला टीडीएस सरकारकडे जमा केला आहे याचाही हा पुरावा असतो.

फॉर्म १६ चे दोन भाग असतात
भाग अ (Part A): यात केवळ टीडीएस कापल्याची आणि तो सरकारी खात्यात जमा झाल्याची माहिती असते.
भाग ब (Part B): यात तुमच्या पगाराची संपूर्ण माहिती (उदाहरणार्थ, मूळ पगार, भत्ते), मिळणाऱ्या वजावटी (जसे की, ८०सी अंतर्गत केलेली गुंतवणूक) आणि तुमचं निव्वळ करपात्र उत्पन्न याची सविस्तर माहिती असते. आयकर रिटर्न भरताना, तुमच्या फॉर्म १६ मध्ये दिलेल्या माहितीमध्ये कोणतीही चूक नाही ना, हे तपासा.

फॉर्म २६AS : तुमच्या कराचं क्रेडिट स्टेटमेंट!
फॉर्म २६AS ला 'टॅक्स क्रेडिट स्टेटमेंट' असंही म्हणतात. हा फॉर्म तुम्हाला वर्षभरात तुमच्या विविध उत्पन्नातून (पगाराव्यतिरिक्त) किती कर कापला गेला आहे, याची माहिती देतो. यात बँक, कंपन्यांकडून मिळालेले उत्पन्न आणि खर्चाची माहिती असते.

यात साधारणपणे खालील गोष्टींची माहिती असते.

  • पगारातून कापलेला टीडीएस
  • उत्पन्नावरील व्याज (जसे की एफडीवरील व्याज)
  • मालमत्ता विक्रीतून मिळालेले उत्पन्न
  • तुम्ही भरलेला आगाऊ कर (Advance Tax)
  • आणि तुम्ही भरलेला स्वयं-मूल्यांकन कर (Self-Assessment Tax)

हा फॉर्म तुम्हाला तुमचा भरलेला किंवा कापलेला कर सरकारच्या खात्यात योग्य वेळी जमा झाला आहे की नाही, हे तपासण्यास मदत करतो. यामुळे तुमचा टोजन्य गोंधळ टाळता येतो.

AIS (वार्षिक माहिती विवरण): तुमच्या आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण लेखाजोखा!
AIS म्हणजेच वार्षिक माहिती विवरण, हे आयकर विभागाने २०२१ मध्ये सुरू केले होते. हा फॉर्म तुमच्या संपूर्ण वर्षातील आर्थिक क्रियाकलापांची तपशीलवार माहिती देतो.

यात काय काय असतं?

  • पगार
  • बँकेतून मिळालेलं व्याज
  • कंपन्यांकडून मिळालेला लाभांश (Dividend)
  • म्युच्युअल फंडमधील व्यवहार
  • शेअर्स आणि इतर सिक्युरिटीजमधील व्यवहार
  • आणि मोठ्या रकमेचे आर्थिक व्यवहार (जसे की, मोठी खरेदी किंवा विक्री)

तुमच्या उत्पन्नाची स्पष्ट कल्पना मिळवण्यासाठी हा फॉर्म आयकर ई-फायलिंग पोर्टलवर सहज उपलब्ध असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जर तुमच्या आयकर रिटर्न (ITR) आणि AIS मध्ये काही विसंगती (फरक) आढळल्यास, आयकर विभाग तुम्हाला याबाबत विचारणा करू शकतो. त्यामुळे ITR भरण्यापूर्वी AIS तपासून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

वाचा - स्वस्तात ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या 'मीशो'चं नाव बदललं! का घेतला मोठा निर्णय?

या तिन्ही फॉर्मची योग्य माहिती घेऊन तुम्ही तुमचा आयकर रिटर्न अचूक आणि व्यवस्थित भरू शकाल.

Web Title: Guide to ITR Filing Understanding Form 16, 26AS, and AIS for Taxpayers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.