Lokmat Money > बिझनेस न्यूज > करून दाखवलं! चार राज्यात पेट्रोल-डिझेलची दरकपात; ग्राहकांना दिलासा

करून दाखवलं! चार राज्यात पेट्रोल-डिझेलची दरकपात; ग्राहकांना दिलासा

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलगपणे वाढ होत आहे. (Petrol Diesel Price Hike) इंधनदरवाढीविरोधात विरोधक वेगवेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवत आहेत. इंधनदरवाढ आणि गॅसच्या वाढलेल्या किमतींवरून विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत असताना देशातील चार राज्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाल्याने ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 12:45 PM2021-02-22T12:45:49+5:302021-02-22T12:48:47+5:30

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलगपणे वाढ होत आहे. (Petrol Diesel Price Hike) इंधनदरवाढीविरोधात विरोधक वेगवेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवत आहेत. इंधनदरवाढ आणि गॅसच्या वाढलेल्या किमतींवरून विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत असताना देशातील चार राज्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाल्याने ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.

four states cut taxes as fuel prices skyrocket in country | करून दाखवलं! चार राज्यात पेट्रोल-डिझेलची दरकपात; ग्राहकांना दिलासा

करून दाखवलं! चार राज्यात पेट्रोल-डिझेलची दरकपात; ग्राहकांना दिलासा

Highlightsपश्चिम बंगालमध्ये इंधनदरात कपातराजस्थानमध्येही करात कपातआसाम, मेघालयमध्येही इंधन स्वस्त

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलगपणे वाढ होत आहे. (Petrol Diesel Price Hike) इंधनदरवाढीविरोधात विरोधक वेगवेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवत आहेत. इंधनदरवाढ आणि गॅसच्या वाढलेल्या किमतींवरून विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत असताना देशातील चार राज्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाल्याने ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. (four states cut taxes as fuel prices skyrocket in country)

इंधन दरवाढीने धर्मसंकटाची स्थिती असल्याचे सांगत इंधनावरील कर कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पावले उचलणे आवश्यक आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटल्यानंतर आणखी एका राज्य सरकारने इंधनावरील करात कपात केली आहे. पश्चिम बंगाल सरकारने इंधनावरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) प्रत्येकी एक रुपयाची कपात केली आहे. त्यामुळे बंगालमध्ये पेट्रोल आणि डिझेल एक रुपयाने स्वस्त झाले आहे.

'लव जिहाद'कडे केरळ सरकार संपूर्णपणे दुर्लक्ष करतंय; योगी आदित्यनाथ यांची टीका

पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापण्याची शक्यता

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांची घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करून दरकपात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.  यावरून आता राजकारण होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल सरकारपूर्वी राजस्थान, आसाम आणि मेघालय या तीन राज्यांनी इंधनावरील स्थानिक करात कपात केली होती. 

राजस्थानमध्येही करात कपात

२९ जानेवारी २०२१ रोजी राजस्थान सरकारने इंधनावरील मूल्यवर्धित करात कपात केली होती. राजस्थानने पेट्रोल डिझेलवरील व्हॅट ३८ टक्क्यांवरून ३६ टक्के केला होता. यामुळे राजस्थानमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या होत्या. 

आसाम, मेघालयमध्येही इंधन स्वस्त

आसाम सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अतिरिक्त पाच टक्के अतिरिक्त कर रद्द केला होता. त्यामुळे आसाममध्ये पेट्रोल आणि डिझेल पाच रुपयांनी स्वस्त झाले होते. मेघालय सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील शुल्कात कपात केली होती. मेघालय राज्य सरकारने पेट्रोलवर ७.४० रुपये आणि डिझेलवर ७.१० रुपये शुल्क कपात केली होती. 

दरम्यान, देशातील चार राज्यांनी व्हॅटमध्ये कपात केली असली, तरी केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कपातीची शक्यता नाकारली आहे. गतवर्षीच्या मार्च महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोलवर १३ रुपये आणि डिझेलवर १६ रूपये उत्पादन शुल्क वाढवले होते.

Web Title: four states cut taxes as fuel prices skyrocket in country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.