Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण

भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर कडक कारवाई करत आहे, ज्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा आर्थिक संकटाच्या खोल गर्तेत अडकलेला दिसतोय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 14:49 IST2025-05-03T14:48:00+5:302025-05-03T14:49:28+5:30

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर कडक कारवाई करत आहे, ज्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा आर्थिक संकटाच्या खोल गर्तेत अडकलेला दिसतोय.

Fear of India causes earthquake in Karachi Stock Exchange now difficult to get out ind pak war possibility | भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण

भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानंपाकिस्तानवर कडक कारवाई करत आहे, ज्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा आर्थिक संकटाच्या खोल गर्तेत अडकलेला दिसतोय. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे कराची स्टॉक एक्स्चेंजमध्ये (KSE) मोठी घसरण नोंदवण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावानं पाकिस्तानचा शेअर बाजार हादरलाय. या हल्ल्यानंतर २३ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान पाकिस्तानच्या बेंचमार्क केएसई-१०० निर्देशांकात ७,१०० अंकांची म्हणजेच सुमारे ६ टक्क्यांची मोठी घसरण दिसून आली.

३० एप्रिलला सर्वात मोठी घसरण

३० एप्रिल रोजी बाजारात मोठी उलथापालथ झाली, जेव्हा केएसई-१०० निर्देशांक ३.०९% किंवा ३,५४५ अंकांनी घसरून १,११,३२६.५७ वर बंद झाला. अलीकडच्या आठवड्यातील ही एक दिवसातील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. या घसरणीत लक, ईएनजीआरओएच, यूबीएल, पीपीएल आणि एफएफसीसह काही प्रमुख शेअर्सची मोठी भूमिका बजावली. या हेवीवेट शेअर्सनी मिळून निर्देशांक ११०० अंकांनी घसरला.

काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

बाजारात तात्पुरता दिलासा

२ मे रोजी बाजाराला काहीसा दिलासा मिळाला, जेव्हा केएसई-१०० निर्देशांक २,७८५ अंकांनी म्हणजेच २.५% वधारला आणि १,१४,११९ वर बंद झाला. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की ही वाढ टिकाऊ असू शकत नाही आणि याकडे डेड कॅट बाऊन्स म्हणून पाहिलं जाऊ शकतं. जोपर्यंत भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव कमी होत नाही, तोपर्यंत बाजारात पुन्हा घसरण होऊ शकते.

आपलेच लोक करताहेत कंगाल

भारत आणि पाकिस्तानमधील भूराजकीय तणावाचा थेट परिणाम गुंतवणूकदारांच्या भावनांवर झाला आहे. बाजारात अनिश्चितता आणि भीतीचं वातावरण असल्यानं गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री सुरू केली आहे. परदेशी गुंतवणूकदारही या परिस्थितीमुळे चिंतेत असून ते आपले पैसे सुरक्षित बाजारपेठेकडे वळवत आहेत.

केवळ देशी गुंतवणूकदारच नव्हे, तर परदेशी गुंतवणूकदारांनीही आपले पैसे पाकिस्तानातून बाहेर काढायला सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीजच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेमुळे परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास सातत्यानं कमकुवत होत आहे. त्यामुळे कराची शेअर बाजारात प्रचंड दबाव आहे.

Web Title: Fear of India causes earthquake in Karachi Stock Exchange now difficult to get out ind pak war possibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.