Lokmat Money > बिझनेस न्यूज > EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...

EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...

केंद्र सरकारने ऑटो सेटलमेंटची मर्यादा १ लाख रुपयांवरुन ५ लाख रुपये केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 19:47 IST2025-06-24T19:46:57+5:302025-06-24T19:47:45+5:30

केंद्र सरकारने ऑटो सेटलमेंटची मर्यादा १ लाख रुपयांवरुन ५ लाख रुपये केली आहे.

EPFO's big announcement; Now you will get advance PF of up to Rs 5 lakh, know... | EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...

EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...

EPFO च्या सदस्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता तुम्हाला तुमच्या पीएफ फंडातून अ‍ॅडव्हान्स घ्यायचा असेल, तर त्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही.  सरकारने ऑटो सेटलमेंटची मर्यादा १ लाख रुपयांवरुन ५ लाख रुपये केली आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज(२४ जून २०२५) ही माहिती दिली. कोव्हिड-१९ महामारीच्या काळात लोकांना त्यांचे पैसे लवकरात लवकर मिळू शकतील, यासाठी ईपीएफओने प्रथम अ‍ॅडव्हान्स क्लेमसाठी ऑटो सेटलमेंट सिस्टम सुरू केली होती. 

पूर्वी ही मर्यादा १ लाख रुपयांपर्यंत होती, परंतु आता ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अशा लोकांना खूप फायदा होईल, ज्यांना अचानक आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज भासते. ही बातमी येताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लोकांनी ईपीएफओचे कौतुक केले. एका युजरने म्हटले, "ईपीएफओने घेतलेले हे पाऊल उत्तम आहे. ज्यांना तातडीने पैशांची गरज आहे त्यांच्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंतचे ऑटो सेटलमेंट ही मोठी दिलासा आहे."

ईपीएफओच्या ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२५ मध्ये १९.१४ लाख नवीन सदस्य सामील झाले आहेत. मार्च २०२५ च्या तुलनेत ही वाढ ३१.३१ टक्के आहे, तर गेल्या वर्षी एप्रिल २०२४ च्या तुलनेत १.१७ टक्के जास्त आहे.  यामध्ये सर्वात जास्त सहभाग १८ ते २५ वयोगटातील तरुणांचा होता. केवळ या वयोगटात ४.८९ लाख लोक ईपीएफओमध्ये सामील झाले, जे एकूण नवीन सदस्यांच्या ५७.६७ टक्के आहे राज्यनिहाय आकडेवारी पाहता, महाराष्ट्राने इतर सर्व राज्यांना मागे टाकत सर्वाधिक नवीन पीएफ सदस्य जोडले आहेत. 

Web Title: EPFO's big announcement; Now you will get advance PF of up to Rs 5 lakh, know...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.