जबरदस्त ऑफर, १ महिना मोफत पाहता येणार टीव्ही; जाणून घ्या काय आहे ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 04:14 PM2021-05-09T16:14:55+5:302021-05-09T16:16:04+5:30

कंपनीनं याशिवाय ग्राहकांना दिलीये आणखी एक भन्नाट ऑफर

dish tv free service offer upto 1 month know how to get it big service provider online recharge | जबरदस्त ऑफर, १ महिना मोफत पाहता येणार टीव्ही; जाणून घ्या काय आहे ऑफर

जबरदस्त ऑफर, १ महिना मोफत पाहता येणार टीव्ही; जाणून घ्या काय आहे ऑफर

Next
ठळक मुद्देकंपनीनं याशिवाय ग्राहकांना दिलीये आणखी एक भन्नाट ऑफर१३४७ रूपयांना ग्राहकांना खरेदी करता येऊ शकतो एचडी सेट टॉप बॉक्स

देशातील सर्वात मोठे डायरेक्ट-टू-होम (DTH) ऑपरेटर डिश टीव्हीने (Dish Tv) आपल्या ग्राहकांना मोफत सेवा देण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना ३० दिवसांची विनामूल्य सेवा देत आहे. ग्राहकांनी कंपनीचा दीर्घकालीन प्लॅन निवडल्यास या ऑफरचा फायदा घेता येणार आहे. 

डिश टीव्हीकडे बरेच असे प्लॅन्स आहेत जे दीर्घकालीन वैधतेसह येतात. या योजनांची वैधता ३ महिने, ६ महिने आणि १२ महिन्यांपेक्षा जास्त आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जिश टीव्हीच्या या लाँग टर्म प्लॅनमध्ये रिचार्ज करणाऱ्याला डीटीएच प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सेवेसाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाही. डिश टीव्ही आपल्या ग्राहकांना एचडी आणि एसडी चॅनलसह निरनिराळ्या किंमतीवर मिक्स्ड पॅक ऑफर करते. आता युझर्स फ्री सेवांसाठी कंपनीकडून ऑफर करण्यात आलेल्या लाँग टर्म प्लॅनचा वापर करून रिचार्ज करू शकतात. 

जर ग्राहकानं ३ महिन्यांचं रिचार्ज केलं तर कंपनी त्यांना ७ दिवसांची अतिरिक्त सेवा विनामूल्य देईल. या व्यतिरिक्त जर ग्राहकांनं ६ महिने आणि १२ महिन्यांसाठी रिचार्ज केलं, तर त्यांना अनुक्रमे १५ दिवस आणि ३ दिवसांची सेवा विनामूल्य मिळेल. याशिवाय १२ महिन्यांचं रिचार्ज केल्यास फ्री बॉक्स स्वॅप सुविधादेखील देण्यात येईल. जर तुम्हाला रिचार्ज करायचा असेल तर कंपनीच्या साईटवर जाऊन तुम्ही रिचार्ज करू शकता किंवा गुगल पे अथवा फोन पे द्वारेही रिचार्ज करणं शक्य आहे. सध्या कंपनीकडून HD STB १३४७ रूपयांना खरेदी करता येऊ शकतो. तर युझर्सना एका महिन्यासाठी ४०८ रूपयांचा प्लॅनही सिलेक्ट करता येऊ शकतो. यामध्ये २९ चॅनल आणि १२ एचडी चॅनल्स दिले जातात.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: dish tv free service offer upto 1 month know how to get it big service provider online recharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app