lokmat Supervote 2024
Lokmat Money >क्रिप्टोकरन्सी > २ महिन्यांनंतर Bitcoin पुन्हा एकदा २५ हजार डॉलर्स पार; इथर, शीबू इनुच्या किंमतीत तुफान वाढ

२ महिन्यांनंतर Bitcoin पुन्हा एकदा २५ हजार डॉलर्स पार; इथर, शीबू इनुच्या किंमतीत तुफान वाढ

Bitcoin Prices On Monday: सोमवारी बिटकॉइनच्या किमतीत प्रचंड वाढ झाली. १३ जूननंतर बिटकॉइनने २५ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 02:03 PM2022-08-15T14:03:28+5:302022-08-15T14:06:41+5:30

Bitcoin Prices On Monday: सोमवारी बिटकॉइनच्या किमतीत प्रचंड वाढ झाली. १३ जूननंतर बिटकॉइनने २५ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

digital currency bitcoin crosses 25000 dollar again after 2 months ether and shiba inu prices also rise | २ महिन्यांनंतर Bitcoin पुन्हा एकदा २५ हजार डॉलर्स पार; इथर, शीबू इनुच्या किंमतीत तुफान वाढ

२ महिन्यांनंतर Bitcoin पुन्हा एकदा २५ हजार डॉलर्स पार; इथर, शीबू इनुच्या किंमतीत तुफान वाढ

Bitcoin Prices On Monday: सोमवारी बिटकॉइनच्या किमतीत जबरदस्त वाढ झाल्याचं दिसून आलं. १३ जूननंतर बिटकॉइनने २५ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. जगातील सर्वात मोठी आणि सर्वात मोठी करन्सी बिटकॉईन सोमवारी १ टक्क्यांनी वाढून २५,२०० डॉलर्सवर पोहोचली. CoinGecko च्या मते, सोमवारी जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप एक ट्रिलियन डॉलर्स वर पोहोचला. जागतिक क्रिप्टो बाजार गेल्या २४ तासांत १.२३ ट्रिलियन डॉलर्सच्या मार्कवर राहिला.

जगातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची आणि लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी इथेरियम ब्लॉकचेनची इथर १ टक्क्यांच्या वाढीसह २००४ डॉलर्सवर पोहोचली. ३१ मे नंतर इथर पहिल्यांदाच शनिवारी २ हजार डॉलर्सच्या वर पोहोचली. तर डॉगकॉइनची किंमत १० टक्क्यांच्या वाढीसह ०.०८ डॉलर्स आणि शीबा इनुदेखील ३४ टक्क्यांच्या वाढीसह ०.००००१७ डॉलर्सवर राहिली.

डिजिटल चलनांची संमिश्र कामगिरी
दुसऱ्या अनेक डिजिटलक्रिप्टोकरन्सीची कामगिरीही संमिश्र राहिली. गेल्या चोवीस तासांत एक्सआरपी, बीएनपी, लिटकॉईन, टीथर, पॉलिगॉनच्या किंमतीत किरकोळ वाढ दिसून आली. तर दुसरीकडे युनिस्वॅप, पोलकाडॉट, चॅनलिंक यांच्या किंमतीत मात्र घसरण दिसून आली.

जुलैमध्ये १७ टक्क्यांची तेजी
मे आणि जून महिन्यात क्रिप्टो बाजारात मोठी घसरण दिसून आली होती. जगभरातील वाढती महागाई आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात केलेली वाढ यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण होतं. या भीतीमुळे काही क्रिप्टोकरन्सी लेंडर्सनं त्यांच्या ग्राहकांना डिजिटल चलन विकण्यापासून रोखले होते. पण, जुलै महिन्यातच भाव वाढू लागले. जुलैमध्ये, बिटकॉइनच्या किंमतीत १७ टक्क्यांची वाढ झाली होती.

Web Title: digital currency bitcoin crosses 25000 dollar again after 2 months ether and shiba inu prices also rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.