coronavirus: Rising corona patients hinder India's route, hinders international air traffic | coronavirus: भारताच्या मार्गात वाढत्या कोरोना रुग्णांचा अडथळा, आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीमध्ये अडचणीच

coronavirus: भारताच्या मार्गात वाढत्या कोरोना रुग्णांचा अडथळा, आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीमध्ये अडचणीच

नवी दिल्ली : कोविड-१९ विषाणू बाधित रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या स्थानी गेल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू होण्याची शक्यता दुरावली आहे.
नागरी उड्डयन महासंचालनालयाने ३१ जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर बंदी घातलेली आहे. देशनिहाय पातळीवर निर्णय घेऊन ही वाहतूक सुरू करण्याचा भारताचा विचार आहे. त्यानुसार, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आणि संयुक्त अरब आमिरात (यूएई) या देशांसोबतची विमान वाहतूक सुरू होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. तथापि, भारतातील वाढलेली रुग्णसंख्या विमान वाहतूक सुरू होण्याच्या मार्गातील मुख्य अडथळा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारतातील कोविड-१९ रुग्णांची संख्या ७ लाखांपेक्षा अधिक झाली आहे.  आता अमेरिका (३० लाख रुग्ण) आणि ब्राझिल (१७ लाख रुग्ण) हे दोनच देश भारताच्या पुढे आहेत.
भारतातून येणाºया विमानांवर युरोपीय संघाने अलीकडेच बंदी घातली आहे.  भारताची रुग्णसंख्या रशियाला मागे टाकून तिसºया स्थानी पोहोचायच्या आधी युरोपीय संघाने हा निर्णय घेतला होता. ब्रिटनने जारी केलेल्या सुरक्षित देशांच्या यादीतही भारताचे नाव नाही. अशा स्थितीत पाश्चात्य देशांपैकी केवळ अमेरिकेसोबतची विमान वाहतूक सुरू करण्याची भारताला संधी आहे.

या देशांशी होऊ
शकतो भारताचा करार

आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू करण्यासाठी भारताकडून करार होण्याची शक्यता असलेल्या देशांत फ्रान्स, जर्मनी आणि यूएई यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus: Rising corona patients hinder India's route, hinders international air traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.