Lokmat Money > बिझनेस न्यूज > कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी

कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी

CMIE Report: देशातील सामान्य व्यक्ती त्यांच्या दैनंदिन जीवनात कोणत्या गोष्टींवर जास्त खर्च करत आहे आणि कोणत्या गोष्टींच्या खरेदीवर ते कात्री लावत आहेत हे उघड झालंय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:35 IST2025-06-17T12:32:39+5:302025-06-17T12:35:47+5:30

CMIE Report: देशातील सामान्य व्यक्ती त्यांच्या दैनंदिन जीवनात कोणत्या गोष्टींवर जास्त खर्च करत आहे आणि कोणत्या गोष्टींच्या खरेदीवर ते कात्री लावत आहेत हे उघड झालंय.

common man of the country is spending more on alcohol than clothes expenses lakh crores in just one year spending money to buy own vehicle | कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी

कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी

CMIE Report: सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचा (CMIE) एक अहवाल नुकताच समोर आलाय. ज्यामध्ये देशातील सामान्य व्यक्ती त्यांच्या दैनंदिन जीवनात कोणत्या गोष्टींवर जास्त खर्च करत आहे आणि कोणत्या गोष्टींच्या खरेदीवर ते कात्री लावत आहेत हे उघड झालंय. देशातील सामान्य उत्पन्न गटातील लोक कपड्यांपेक्षा अल्कोहोल आणि कोल्ड्रिंक्सवर जास्त खर्च करत असल्याचं या रिपोर्टधून सागण्यात आलंय.

२०२३-२४ मध्ये लोकांनी त्यांच्या कमाईपैकी ७.२९ लाख कोटी रुपये कपड्यांवर खर्च केले. त्याच वेळी १.२० लाख कोटी रुपये अल्कोहोलयुक्त पेयांवर खर्च केले गेले. याच्या एक वर्षापूर्वी, म्हणजेच २०२२-२३ मध्ये, जिथे लोकांनी कपड्यांवर ७.६० लाख कोटी रुपये खर्च केले. त्याच वेळी, अल्कोहोलवर ०.९५ लाख कोटी रुपये खर्च केले होते. यावरून स्पष्ट होते की या वर्षात कपड्यांवरील खर्च कमी झाला आहे, तर अल्कोहोलवरील खर्च २६ टक्क्यांनी वाढला आहे.

"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा

स्वत:ची गाडी खरेदी करण्यावरही भर

अशाप्रकारे, २०२२-२३ च्या तुलनेत, २०२३-२४ मध्ये लोकांचा स्वतःचा वाहन खरेदीवरील खर्चही वाढला आहे, जो एका वर्षापूर्वी २.६४ लाख कोटी रुपये होता. तर, एका वर्षानंतर तो ३.२६ लाख कोटी रुपये झाला. त्याच वेळी, वाहतूक सेवेवरील खर्च २०२२-२३ मध्ये १४.३२ लाख कोटी रुपयांवरून २०२३-२४ मध्ये १५.५० लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला. म्हणजेच, स्वतःचं वाहन खरेदी करण्याचा खर्च सार्वजनिक वाहतुकीवरील खर्चाच्या तिप्पट वाढला आहे.

आरोग्य सेवांवर खर्च किती?

लोक हळूहळू त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक होत आहेत कारण या काळात आरोग्य सेवांवरील खर्च १८.७५ टक्क्यांनी वाढला आहे, जो २०२२-२३ मध्ये ८.४८ लाख रुपयांवरून २०२३-२४ मध्ये १०.०७ लाख कोटी रुपयांवर पोहोचला. त्याच वेळी, विमा प्रीमियमवरील खर्च ३.३९ टक्क्यांनी कमी झाला आहे, जिथे २०२२-२३ मध्ये प्रीमियमची रक्कम १.७७ लाख कोटी रुपये होती. त्याच वेळी, तो २०२३-२४ मध्ये १.७१ लाख कोटी रुपयांवर आला.

खाण्यापिण्यावरील खर्च वाढला

या काळात मनोरंजनावरील खर्चातही १.३८ टक्क्यांनी घट झाली आहे, परंतु इंटरनेट आणि कॉलवरील खर्चातही ८ टक्क्यांनी वाढ झाली. २०२३-२४ मध्ये अन्नपदार्थांवरील खर्चाचा वाटा २८ टक्के म्हणजेच ५.१५ लाख कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षीपेक्षा ८.६ टक्के जास्त आहे. यामागील कारण वाढती महागाई ठरू शके. भाज्यांपासून फळे, धान्य-डाळी, दूध, अंडी, साखर, जाम या सर्व गोष्टींवरील खर्च गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला आहे.

Web Title: common man of the country is spending more on alcohol than clothes expenses lakh crores in just one year spending money to buy own vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.