gold atm : एटीएम (ऑटोमेटेड टेलर मशीन) मशीन्स आता फक्त पैसे काढणे किंवा भरण्यापुरते मर्यादीत राहिल्या नाहीत. खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून सॅनिटरी नॅपकिन्सपर्यंत अनेक गोष्टी आता एटीएमद्वारे मिळत आहे. याचा फायदा असा की रात्री-अपरात्री आवश्यक वस्तूंसाठी धावपळ करण्याची गरज नाही. पण, आता एटीएमद्वारे सोन्याची खरेदी विक्री होणार आहे, असं सांगितल तर तुमचा विश्वास बसेल का? पण, ही गोष्ट आता वास्तवात आली आहे. शांघायमधील एका मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये एक अनोखे एटीएम बसवण्यात आले आहे. हे शांघायमधील पहिले सोन्याचे एटीएम आहे. जगात सोन्याच्या किमती वाढत असताना, हे छोटे यंत्र लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनत आहे.
स्थानिक माध्यमांनुसार, या एटीएममध्ये नेहमीच लोकांची गर्दी असते. हे एटीएम १२०० अंश सेल्सिअस तापमानात सोने वितळवते, सोन्याची शुद्धता तपासते आणि थेट किंमत देखील दाखवते. तुम्ही बँकेतून पैसे देखील ट्रान्सफर करू शकता.
A gold ATM in Shanghai, China
— Tansu Yegen (@TansuYegen) April 19, 2025
It melts the gold and transfers the amount corresponding to its weight to your bank account.
pic.twitter.com/hFu3AjqEo2
सोन्याचे एटीएम कसे काम करते?
या एटीएममधून सोन्याचे व्यवहार करणे खूप सोपे आहे. सर्वप्रथम हे यंत्र सोन्याचे वजन करते. ते सोने ९९.९९% शुद्ध आहे की नाही हे तपासते. मग मशीन शांघाय गोल्ड एक्सचेंजच्या लाईव्ह रेटनुसार पैशांची गणना करते. यातून एक छोटे सेवा शुल्क वजा केले जाते. एका युजरने गोल्ड एटीएमचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X पोस्ट केला आहे. 'वाह! आशा आहे की लवकरच आपल्याला भारतातही सोन्याचे एटीएम दिसेल, असे कॅप्शन या व्हिडीओ दिलं आहे. दुसऱ्या एका वापरकर्त्याने गंमतीने म्हटले की हे भारतासाठी एक उत्तम उत्पादन आहे. पण चोरांचं काय?
वाचा - मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये
चीनमध्ये सोन्याला किती महत्त्व?
भारताप्रमाणेच चीनमध्येही सोने हे समृद्धी आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. लग्न, मुलाचा जन्म आणि सण अशा प्रसंगी सोन्याच्या भेटवस्तू दिल्या जातात. रिपोर्टनुसार, हे एटीएम शेन्झेन येथील कंपनी किंगहूड ग्रुपने बनवले आहे. हे एटीएम चीनमधील अंदाजे १०० शहरांमध्ये बसवण्यात आले आहे. शांघायमध्ये आणखी एक सोन्याचे एटीएम बसवले जाणार आहे. याचा अर्थ लोक आता एटीएममधून सोने खरेदी करण्यात अधिक रस दाखवत आहेत. सोन्याची किंमत वाढताच, ही मशीन्स आणखी लोकप्रिय होतील असा कंपनीचा दावा आहे. ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय सोने सहज खरेदी आणि विक्री करता येईल.