bsnl rupees 108 plan unlimited callling daily 1gb data 500 sms for 60 days compete jio airtel vi | १०८ रूपयांमध्ये दररोज १ जीबी डेटा, ६० दिवसांची वैधता; 'ही' कंपनी देतेय भन्नाट ऑफर

१०८ रूपयांमध्ये दररोज १ जीबी डेटा, ६० दिवसांची वैधता; 'ही' कंपनी देतेय भन्नाट ऑफर

ठळक मुद्देयापूर्वी हा प्लॅन २८ दिवसांच्या वैधतेसह येत होता.या प्लॅनसोबत मिळतोय अनलिमिटेड डेटाही

भारत संचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) बहुतांश रिचार्ज प्लॅन्स त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपन्या जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनआयडियापेक्षा स्वस्त आणि अधिक वैधता असलेले आहेत. आज आपण असा एक प्लॅन पाहणार आहोत जो ६० दिवसांच्या वैधतेसह येतो आणि त्यामध्ये ग्राहकांना दररोज डेटा आणि कॉलिंगसारखे फीचर्सही मिळतात. त्याचबरोबर इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत या प्लॅन्सची किंमत खूपच कमी आहे. या प्लॅनची किंमत फक्त १०८ रुपये इतकी आहे. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनआयडियासारख्या कंपन्या या दरात दररोज डेटा आणि कॉलिंग बेनिफिट्स देणारे कोणतेही प्लॅन्स देत नाहीत. 

BSNL च्या १०८ रूपयांच्या प्रीपेड प्लॅन्समध्ये ग्राहकांना अनलिमिडेट कॉलिंगची सुविधाही मिळते. यामध्ये दिल्ली आणि मुंबईच्या एमटीएनएल नेटवर्कवरही या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो. तसंच यासोबत अनलिमिटेड डेटाही देण्यात येतो. परंतु १ जीबी डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड कमी होऊन तो ८० केबीपीएस करण्यात येतो. १०८ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १ जीबी डेटाचा लाभ मिळतो. याव्यतिरिक्त या प्लॅनसोबत ५०० एसएमएसही देण्यात येतात. यापूर्वी हा प्लॅन २८ दिवसांच्या वैधतेसह येत होता. परंतु टेलिकॉम क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे याची वैधता २८ दिवसांवरून ६० दिवस करण्यात आली. 

अन्य टेलिकॉम कंपन्यांबद्दल सांगायचं झालं तर रिलायन्स जिओ १२५ रूपयांमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता देतं. यामध्ये ग्राहकांना दररोज ५०० एमबी डेटा मइळतो आणि यात अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएसही मिळतात. तर एअरटेल १२९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज १ जीबी डेटा देतं. यासोबत २४ दिवसांची वैधता मिळते. तर दुसरीकडे व्होडाफोन आयडियादेखील १२९ रूपयांच्या प्लॅनमध्ये २४ दिवसांच्या वैधतेसह दररोज २ जीबी डेटा देतं. तसंच यासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएसही देण्यात येतात. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bsnl rupees 108 plan unlimited callling daily 1gb data 500 sms for 60 days compete jio airtel vi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.