Lokmat Money > बिझनेस न्यूज > Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट

Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट

Sangareddy Pharma Company Blast: सिगाची इंडस्ट्रीजच्या फार्मा प्लांटमध्ये झालेल्या स्फोटाचा परिणाम त्यांच्या शेअर्सवर दिसून येत आहे. शेअर्समध्ये जोरदार घसरण दिसून येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:20 IST2025-07-01T13:20:08+5:302025-07-01T13:20:08+5:30

Sangareddy Pharma Company Blast: सिगाची इंडस्ट्रीजच्या फार्मा प्लांटमध्ये झालेल्या स्फोटाचा परिणाम त्यांच्या शेअर्सवर दिसून येत आहे. शेअर्समध्ये जोरदार घसरण दिसून येत आहे.

Blast in Sangareddy Sigachi company shares hit hard Plant closed major crisis on production | Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट

Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट

Sangareddy Pharma Company Blast: सिगाची इंडस्ट्रीजच्या फार्मा प्लांटमध्ये झालेल्या स्फोटाचा परिणाम त्यांच्या शेअर्सवर दिसून येत आहे. शेअर्समध्ये जोरदार घसरण दिसून येत आहे. दोन दिवसांत कंपनीचे शेअर्स ५५.९० रुपयांवरून ४५.३६ रुपयांवर आलेत. म्हणजेच गुंतवणूकदारांना दोन दिवसांत मोठा झटका बसलाय. तेलंगणातील हैदराबादमधील संगारेड्डी येथील सिगाची इंडस्ट्रीजच्या फार्मा प्लांटमध्ये झालेल्या स्फोटात मृतांची संख्या ३४ झाली आहे. सोमवारी कंपनीचे शेअर्स ४८.९५ रुपयांवर बंद झाले. विक्रीच्या दबावामुळे शेअर्सच्या किमतीत ही मोठी घसरण झाली.

सोमवार, ३० जून रोजी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी हैदराबाद येथील सिगाची इंडस्ट्रीजच्या फार्मास्युटिकल प्लांटमध्ये एक मोठा रिअॅक्टर स्फोट झाला. हा प्लांट तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील पशमयाराम इंडस्ट्रियल एरियात आहे. या स्फोटामुळे मोठी आग लागली आणि रिअॅक्टर युनिट असलेली इमारत अंशतः कोसळली.

१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री

उत्पादनावर परिणाम, प्लांट बंद

सिगाची इंडस्ट्रीजचं मुख्य उत्पादन मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोज (एमसीसी) आहे. कंपनीचे तीन प्लांट आहेत, ज्यांची एकूण उत्पादन क्षमता वार्षिक २१,७०० मेट्रिक टन आहे. हैदराबादमधील ही घटना घडलेल्या प्लांटची क्षमता वार्षिक ६,००० मेट्रिक टन आहे. नुकसानीमुळे, हा प्लांट सुमारे तीन महिने (९० दिवस) बंद ठेवावा लागेल. या काळात, गुजरातमधील उर्वरित दोन प्लांटमधून उत्पादन वाढवून तोटा कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल.



शेअरमध्ये मोठी घसरण

या घटनेचा परिणाम कंपनीच्या स्टॉकवर लगेच दिसून आला. सोमवारी, स्टॉकमध्ये ११.५% नं मोठी घसरण झाली. मंगळवार, १ जुलै रोजी, दिवसाच्या व्यवहारादरम्यान, स्टॉक ७% नं घसरून ४५.३६ रुपयांवर आला. ऑगस्ट २०२४ मध्ये, स्टॉकनं ६९.७५ रुपयांचा वर्षभराचा उच्चांक गाठला, त्या तुलनेत ही किंमत आता ३१% पेक्षा खाली आली आहे. गेल्या काही महिन्यांत हा स्टॉक देखील अस्थिर राहिला आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Blast in Sangareddy Sigachi company shares hit hard Plant closed major crisis on production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.