Lokmat Money > बिझनेस न्यूज > चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...

चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...

Apple ने आपले सर्व iPhone भारतात बनवण्याची तयारी सुरू केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 20:03 IST2025-05-06T20:02:02+5:302025-05-06T20:03:30+5:30

Apple ने आपले सर्व iPhone भारतात बनवण्याची तयारी सुरू केली आहे.

Big blow to China; All iPhone models will be manufactured in India, Union Minister informs | चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...

चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...

Apple येत्या काळात iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात बनवण्याच्या तयारीत आहे. भारतात तयार झालेल्या आयफोनला अमेरिकेसह जगभरातील देशांमध्ये निर्यात केले जाईल. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी Bharat Telecom 2025 इव्हेंटमध्ये याबाबत माहिती दिली. यामुळे चीनला मोठा धक्का बसणार आहे. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या ट्रेड वॉरच्या पार्श्वभूमीवर भारत मोबाइल मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. 

Bharat Telecom 2025 इव्हेंटमद्ये केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, "अॅपलने येत्या काही वर्षांत त्यांची सर्व उत्पादने आणि मोबाईल फोन्स भारतातच तयार करण्याचा निर्णय घेतला आहे." 

भारतात बनणार सर्व iPhone
अलीकडेच अॅपल अर्निंग कॉल दरम्यान कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी देखील घोषणा केली की, पुढील तिमाहीपासून म्हणजेच जूनपासून, अमेरिकेत विकले जाणारे बहुतेक आयफोन भारतातून निर्यात केले जातील. म्हणजेच ते पूर्णपणे भारतात बनवले जातील. परंतू, जागतिक बाजारात विकले जाणारे बहुतांश आयफोन चीनमध्ये तयार केले जातील. अमेरिकेव्यतिरिक्त, भारतात बनवलेले आयफोन युरोपीय देशांमध्येही निर्यात केले जातील.

आयातदार ते आघाडीचा निर्यातदार
केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी या कार्यक्रमात सांगितले की, 2014 मध्ये भारत मोबाईल आयातदार ते आघाडीचा निर्यातदार बनला आहे, ही अभिमानाची बाब आहे. 2014 मध्ये भारताने 60 लाख मोबाईल फोनची निर्मिती केली, तर 21 कोटी युनिट्स आयात केले. 2024 मध्ये भारताने 33 कोटी युनिट्सचे उत्पादन केले, त्यापैकी 5 कोटी युनिट्स भारताबाहेर निर्यात करण्यात आले आहेत. हे केवळ पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडिया उपक्रमामुळे शक्य झाले आहे.

99% गावांमध्ये 5G पोहोचले
इंडिया टेलिकॉम 2025 कार्यक्रमादरम्यान, केंद्रीय दळणवळण मंत्री म्हणाले की, भारतातील 99% गावांमध्ये 5G पोहोचले आहे. देशातील 82% लोकसंख्येपर्यंत 5जी नेटवर्कची पोहोच, ही एखाद्या क्रांतीपेक्षा कमी नाही. यासाठी 4.7 लाख मोबाईल टॉवर बसवण्यात आले आहेत. भारतात सुपरफास्ट मोबाईल कम्युनिकेशन्स प्रदान करण्यासाठी डिजिटल महामार्ग बांधले जात आहेत. देशातील 140 कोटी लोकांना त्याचा लाभ मिळेल.

Web Title: Big blow to China; All iPhone models will be manufactured in India, Union Minister informs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.