महागाईच्या या काळात स्वतःचं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण आजच्या काळात जेव्हा रिअल इस्टेटच्या किमती गगनाला भिडत आहेत, तेव्हा प्रश्न पडतो की जर तुम्हाला १ कोटी रुपयांचे घर विकत घ्यायचं असेल, तर तुमचा पगार किती असावा? या प्रश्नाचं उत्तर इनव्हेस्टमेंट बँकर आणि बिझनेस एज्युकेटर सार्थक अहुजा यांनी दिलं आहे. त्यांनी चार असे आर्थिक नियम सांगितले आहेत, ज्यावरून तुम्ही तुमची उत्पन्न क्षमता किती किमतीचं घर घेण्याची परवानगी देते हे ठरवू शकता.
सार्थक अहुजा म्हणतात की, घर खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या उत्पन्न, कर्जाची क्षमता आणि ईएमआय व्यवस्थापनाचं योग्य मूल्यांकन केले पाहिजे. चला त्यांचे चार गोल्डन नियम जाणून घेऊया.
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
१. घराची किंमत: जर तुमचं वार्षिक घरगुती उत्पन्न २० लाख रुपये असेल, तर तुम्ही जास्तीत जास्त १ कोटी रुपयांपर्यंतचं घर खरेदी करू शकता. म्हणजेच, १ कोटी रुपयांचे घर घेण्यासाठी तुमचं वार्षिक उत्पन्न किमान २० लाख रुपये असायला हवं, म्हणजे अंदाजे १.६-१.७ लाख रुपये महिना (इनहँड).
२. २०-३०% डाउन पेमेंट: अहुजा यांच्या मते, कोणत्याही प्रॉपर्टीसाठी तुमच्याकडे किमान २०-३०% रक्कम डाउन पेमेंट म्हणून असावी. म्हणजेच, जर घराची किंमत १ कोटी रुपये असेल, तर तुमच्याकडे २०-३० लाख रुपये रोख किंवा बचतीच्या रूपात असावेत. उर्वरित रकमेसाठी कर्ज घेतले जाऊ शकते, परंतु ते घराच्या एकूण मूल्याच्या ६५% पेक्षा जास्त नसावं.
३. ईएमआयचा भार: जर तुमचा इनहँड पगार १.६ लाख रुपये असेल, तर तुमचा ईएमआय जास्तीत जास्त दरमहा ५५ ते ६० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावा. यामुळे तुमच्या आर्थिक आरोग्यावर भार पडणार नाही आणि इतर खर्चांसाठी पुरेशी सोय राहील.
४. कर्जाचा कालावधी २० वर्षांपेक्षा कमी ठेवा: अहुजा यांच्या मते, खूप मोठा कर्जाचा कालावधी व्याजाच्या स्वरूपात मोठी रक्कम काढून घेतो. त्यामुळे, कर्ज २० वर्षांत किंवा त्यापूर्वी संपवण्याचा प्रयत्न करा.
