Lokmat Money >बँकिंग > RBI MPC Meeting Updates: ट्रम्प टॅरिफच्या धक्क्यादरम्यान RBI चा सामान्यांना दिलासा, पुन्हा EMI होणार कमी; रेपो दरात कपात

RBI MPC Meeting Updates: ट्रम्प टॅरिफच्या धक्क्यादरम्यान RBI चा सामान्यांना दिलासा, पुन्हा EMI होणार कमी; रेपो दरात कपात

RBI Cuts Repo Rate: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या यापूर्वीच्या बैठकीत सामान्यांना दिलासा देत रिझर्व्ह बँकेनं रेपो दर कमी केले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा रेपो दर कमी करून रिझर्व्ह बँकेनं सामन्यांना दिलासा दिलाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 10:07 IST2025-04-09T10:07:26+5:302025-04-09T10:07:26+5:30

RBI Cuts Repo Rate: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या यापूर्वीच्या बैठकीत सामान्यांना दिलासा देत रिझर्व्ह बँकेनं रेपो दर कमी केले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा रेपो दर कमी करून रिझर्व्ह बँकेनं सामन्यांना दिलासा दिलाय.

RBI Monetary Policy Updates RBI s relief to the common people amid the shock of Trump tariffs EMI will be reduced again Repo rate cut | RBI MPC Meeting Updates: ट्रम्प टॅरिफच्या धक्क्यादरम्यान RBI चा सामान्यांना दिलासा, पुन्हा EMI होणार कमी; रेपो दरात कपात

RBI MPC Meeting Updates: ट्रम्प टॅरिफच्या धक्क्यादरम्यान RBI चा सामान्यांना दिलासा, पुन्हा EMI होणार कमी; रेपो दरात कपात

RBI Monetary Policy Updates: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या यापूर्वीच्या बैठकीत सामान्यांना दिलासा देत रिझर्व्ह बँकेनं रेपो दर कमी केले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा रेपो दर कमी करून रिझर्व्ह बँकेनं सामन्यांना दिलासा दिलाय. आज पुन्हा एकदा रेपो दरात २५ बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आली. यानंतर रेपो दर ६ टक्क्यांवर आला आहे. या कपातीनंतर पुन्हा एकदा कर्जाचे ईएमआय कमी होणार आहेत. ट्रंम्प यांच्या टॅरिफच्या घोषणांदरम्यान रिझर्व्ह बँकेचं हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे. यापूर्वी झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात २५ बेसिस पॉईंट्सची कपात करून दिलासा देण्यात आला होता. ७ ते ९ एप्रिलदरम्यान रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

एमपीसीने सध्याचा महागाई दर उद्दिष्टापेक्षा कमी असल्याचं मान्य केलं. बैठकीतील सर्व सदस्य दरात कपात करण्याच्या बाजूनं होते. आरबीआयनं आपली भूमिक न्यूट्रलवरून अॅकोमोडेटिव्ह अशी केली आहे. यापूर्वी आरबीआयने फेब्रुवारीमहिन्यात व्याजदरात कपात केली होती. त्यावेळी व्याजदर ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर आणण्यात आला होता. ही कपात पूर्ण ५ वर्षांनंतर करण्यात आली.

किती कमी होऊ शकतो तुमचा EMI? होम लोन घेणाऱ्यांना रिझर्व्ह बँकेकडून मोठं गिफ्ट, रेपो दरात कपात

एमएसएफ आणि एसडीएफच्या दरातही कपात

आरबीआयने एमएसएफ आणि एसडीएफच्या दरात कपात करण्याची घोषणा केली. एमएसएफ दर ०.२५% ने कमी होऊन ६.२५% झाला, तर एसडीएफ दर ०.२% नं कमी होऊन ५.७५% झाला. आपल्या भाषणादरम्यान आरबीआय गव्हर्नरांनी आर्थिक वर्ष २०२६ ची सुरुवात चिंताजनक पद्धतीनं झाल्याचं म्हटलं. टॅरिफ वॉरमुळे अनिश्चितता वाढली आहे. टॅरिफ वॉरमुळे कच्च्या तेलाच्या किमती चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. मात्र, अनिश्चित वातावरणात भारताची स्थिती स्थिर आहे. जागतिक तणावाच्या काळात धोरणात्मक आराखड्याने परिस्थितीचा समतोल साधला असल्याचंही मल्होत्रा म्हणाले.

बँक ऑफ अमेरिका (BofA) ग्लोबल रिसर्चनुसार, एप्रिलमध्ये होणाऱ्या पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीत आरबीआय पुन्हा एकदा रेपो दरात कपात करू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. बँक ऑफ अमेरिकेचा अंदाज आहे की आरबीआय रेपो दरात २५ बेसिस पॉईंट्स (०.२५%) कपात करून तो ६% पर्यंत आणू शकते, असं त्यांनी म्हटलं होतं. तसंच पुढील काही महिने महागाई ४ टक्क्यांच्या खाली राहण्याची शक्यता असून रुपयावरील दबाव कमी होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं.

आगामी काळात मंदी येण्याची चिंता

डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील देशांवर टॅरिफ लागू केलं आहे. याचा परिणाम जागतिक व्यापारावर होणार आहे. त्यामुळे आगामी काळात जागतिक मंदी येण्याची अपेक्षा भीती व्यक्त करण्यात येतेय. अमेरिकेमध्ये याविरोधात नागरिक रस्त्यांवर उतरले होते. ट्रम्प यांच्या टॅरिफ हट्टामुळे अमेरिकेच्या बाजारामध्ये मोठी घसरण झाली. त्याचप्रमाणे भारतीय शेअर बाजारातही घसरण झालेली दिसून आली. याशिवाय चौथ्या तिमाहीची कंपन्यांच्या निकालाची आकडेवारी जाहीर होण्यास प्रारंभ होणार आहे. त्याचाही बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

काय म्हणाले एक्सपर्ट्स?

भारतीय रिझर्व्ह बँकेचा प्रमुख व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्सने कपात करण्याचा निर्णय हा गृहनिर्माण क्षेत्राच्या आगामी आर्थिक वर्षासाठी एक स्वागतार्ह पाऊल आहे. कमी व्याजदरांमुळे गृहकर्ज अधिक परवडणारे होतील, संभाव्य घर खरेदीदारांची खरेदी शक्ती वाढेल आणि रिअल इस्टेट बाजाराच्या विविध विभागांमध्ये मागणी वाढेल. ही कपात गृहनिर्माण बाजारातील सध्याच्या गतीशी सुसंगत आहे, ज्यामुळे पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांना आणि गुंतवणूकदार दोघांनाही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करण्यास प्रोत्साहन मिळेल. शिवाय, कमी झालेले कर्ज घेण्याचे खर्च परवडणाऱ्या गृहनिर्माण विभागाला चालना देण्याची शक्यता आहे, ज्यामुळे व्यापक लोकसंख्येसाठी घर खरेदी अधिक सुलभ होईल. एकूणच, ही दर कपात ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी आणि रिअल इस्टेट उद्योगाच्या वाढीच्या मार्गात सकारात्मक योगदान देऊ शकते, अशी प्रतिक्रिया नाहर ग्रुपच्या उपाध्यक्षा आणि वरिष्ठ उपाध्यक्ष (नरेडको, महाराष्ट्र) मंजू याज्ञिक यांनी दिली.

Web Title: RBI Monetary Policy Updates RBI s relief to the common people amid the shock of Trump tariffs EMI will be reduced again Repo rate cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.