lokmat Supervote 2024
Lokmat Money >बँकिंग > अरे बापरे! ऑक्टोबरही आला; हिटचे माहिती नाही, पण सुट्ट्यांसाठी सुपरहिट, एवढे दिवस बँकांना टाळे

अरे बापरे! ऑक्टोबरही आला; हिटचे माहिती नाही, पण सुट्ट्यांसाठी सुपरहिट, एवढे दिवस बँकांना टाळे

सध्या ऑनलाईनचा काळ असल्याने बरीचशी कामे ऑनलाईनत होत आहेत. परंतू, वयस्कर लोक किंवा व्यापारी, विद्यार्थी यांना बँकांची कामे बँकेतच जाऊन करावी लागत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 05:15 PM2023-09-24T17:15:36+5:302023-09-24T17:16:21+5:30

सध्या ऑनलाईनचा काळ असल्याने बरीचशी कामे ऑनलाईनत होत आहेत. परंतू, वयस्कर लोक किंवा व्यापारी, विद्यार्थी यांना बँकांची कामे बँकेतच जाऊन करावी लागत आहेत.

OMG! October also came; Don't know about hit, but super hits for bank holidays, see time table | अरे बापरे! ऑक्टोबरही आला; हिटचे माहिती नाही, पण सुट्ट्यांसाठी सुपरहिट, एवढे दिवस बँकांना टाळे

अरे बापरे! ऑक्टोबरही आला; हिटचे माहिती नाही, पण सुट्ट्यांसाठी सुपरहिट, एवढे दिवस बँकांना टाळे

सप्टेंबर पावसासाठी आणि गणपतीच्या सुट्ट्यांमध्येच संपत आला आहे. गेला दीड महिना उन्हाचा ताप सहन करता करता कधी उष्णतेच्या झळा देणारा ऑक्टोबर उजाडला हे समजले देखील नाहीय. पण ऑक्टोबरची चाहूल कॅलेंडरने करून दिली आहे. सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवाच्या सुट्ट्या अजून संपल्या नाहीएत तोच ऑक्टोबरमधील बँक हॉलिडेंची यादी आली आहे. 

सध्या ऑनलाईनचा काळ असल्याने बरीचशी कामे ऑनलाईनत होत आहेत. परंतू, वयस्कर लोक किंवा व्यापारी, विद्यार्थी यांना बँकांची कामे बँकेतच जाऊन करावी लागत आहेत. तसेच अन्य कामे देखील बँकेत जाऊनच करावी लागत आहेत. यामुळे ऑक्टोबरमध्ये उष्णता पडेल की नाही हे सांगता येत नसले तरी बँकांची कामांचे सुट्ट्यांनुसार नियोजन करणे गरजेचे असणार आहे. 

ऑक्टोबरमध्ये अनेक प्रकारचे सण येत आहेत. त्यात आपला देश विविधतेचा असल्याने त्या त्या राज्यांच्या सार्वजनिक सुट्ट्या देखील असतात. यानुसार ऑक्टोबरमध्ये १५ दिवसच बँकांचे कामकाज सुरु असणार आहे. म्हणजे १६ दिवस बँका बंद असणार आहेत. यामध्ये रविवारची सुटी देखील आहे. 

ऑक्टोबर महिन्यातील सुट्या...

  • 1 ऑक्टोबर 2023 - रविवार सर्वत्र
  • 2 ऑक्टोबर 2023 - सर्वत्र महात्मा गांधी जयंती
  • 8 ऑक्टोबर 2023 - रविवार सर्वत्र
  • 14 ऑक्टोबर 2023 - महालय कोलकाता
  • 15 ऑक्टोबर 2023 - रविवारी सर्वत्र
  • 18 ऑक्टोबर 2023 - कटी बिहू, गुवाहाटी
  • 21 ऑक्टोबर 2023 - दुर्गा पूजा (सप्तमी) आगरतळा, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता
  • 22 ऑक्टोबर 2023 - रविवार सर्वत्र
  • 23 ऑक्टोबर 2023 - दुर्गा पूजा (नवमी) आगरतळा, बंगलोर, भुवनेश्वर, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, कानपूर, कोची, कोहिमा, कोलकाता, लखनौ, पाटणा, रांची, शिलाँग, तिरुवनंतपुरम.
  • 24 ऑक्टोबर 2023 - सर्वत्र दुर्गा पूजा (दशमी).
  • 25 ऑक्टोबर 2023 - दुर्गा पूजा गंगटोक
  • 26 ऑक्टोबर 2023 - दुर्गा पूजा (दसैन) गंगटोक, जम्मू, श्रीनगर
  • 27 ऑक्टोबर 2023 - दुर्गा पूजा (दसैन) गंगटोक
  • 28 ऑक्टोबर 2023 - लक्ष्मी पूजन कोलकाता
  • 29 ऑक्टोबर 2023 - रविवार सर्वत्र
  • 31 ऑक्टोबर 2023 - सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस, अहमदाबाद
     

Web Title: OMG! October also came; Don't know about hit, but super hits for bank holidays, see time table

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक