Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >बँकिंग > स्वप्नातलं घर घेताय? आयसीआयसीआय की ॲक्सिस; कोणत्या बँकेचे गृहकर्ज ठरेल फायदेशीर?

स्वप्नातलं घर घेताय? आयसीआयसीआय की ॲक्सिस; कोणत्या बँकेचे गृहकर्ज ठरेल फायदेशीर?

Home Loan : आज आम्ही तुम्हाला देशातील दोन अग्रगण्य खाजगी बँकांच्या गृहकर्ज योजनांबद्दल माहिती देणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:14 IST2026-03-18T16:00:36+5:302026-03-18T16:14:24+5:30

Home Loan : आज आम्ही तुम्हाला देशातील दोन अग्रगण्य खाजगी बँकांच्या गृहकर्ज योजनांबद्दल माहिती देणार आहोत.

ICICI vs Axis Bank Home Loan: Comparison of Interest Rates and EMI for 30 Lakh Loan | स्वप्नातलं घर घेताय? आयसीआयसीआय की ॲक्सिस; कोणत्या बँकेचे गृहकर्ज ठरेल फायदेशीर?

स्वप्नातलं घर घेताय? आयसीआयसीआय की ॲक्सिस; कोणत्या बँकेचे गृहकर्ज ठरेल फायदेशीर?

Home Loan : रिअल इस्टेटचे वाढते भाव आणि घरांच्या किमती गगनाला भिडल्यामुळे आजच्या काळात स्वतःचे घर घेणे ही एक मोठी आर्थिक कसरत ठरत आहे. पगारदार वर्गासाठी होम लोन हाच एकमेव आधार उरला आहे. मात्र, कर्ज घेण्यापूर्वी बँकांच्या व्याजदरांची तुलना करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण व्याजातील छोटासा फरकही तुमच्या खिशावर लाखांचा बोजा टाकू शकतो. आज आपण देशातील दोन दिग्गज खासगी बँका आयसीआयसीआय आणि ॲक्सिस  बँक यांच्या गृहकर्जाच्या गणिताचा आढावा घेणार आहोत.


१. आयसीआयसीआय बँक : स्वस्त व्याजाचा पर्याय?
आयसीआयसीआय बँक ही देशातील आघाडीची खासगी बँक असून, सध्या ही बँक आपल्या ग्राहकांना ७.४५ टक्के या सुरुवातीच्या व्याजदराने गृहकर्ज ऑफर करत आहे.
कर्जाचे गणित : जर तुम्ही ३० लाख रुपयांचे कर्ज २० वर्षांच्या कालावधीसाठी घेतले.
व्याजदर : ७.४५% (अंदाजे)
मासिक हप्ता : २४,०७६ रुपये
एकूण परतफेड : ५७,७८,२७८ रुपये
केवळ व्याजाचा वाटा : २७,७८,२७८ रुपये
येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, हा व्याजदर तुमच्या सिबिल स्कोर आणि पात्रतेनुसार बदलू शकतो.

२. ॲक्सिस बँक : विश्वासार्हता आणि सुलभता
दुसरीकडे, ॲक्सिस बँक आपल्या ग्राहकांसाठी ८ टक्के या सुरुवातीच्या व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध करून देत आहे.
कर्जाचे गणित: जर तुम्ही ३० लाख रुपयांचे कर्ज २० वर्षांसाठी घेतले.
व्याजदर : ८.००%
मासिक हप्ता : २५,०९३ रुपये
एकूण परतफेड : ६०,२२,३६९ रुपये
केवळ व्याजाचा वाटा : ३०,२२,३६९ रुपये

३० लाख रुपयांचे कर्ज (२० वर्षे कालावधी)

तपशील आयसीआयसीआय बँकॲक्सिस बँकफरक (जादा खर्च)
व्याजदर७.४५%८.००%०.५५%
मासिक हप्ता२४,०७६२५,०९३१,०१७
एकूण व्याजाची रक्कम२७.७८ लाख३०.२२ लाख२.४४ लाख

वाचा - टॅक्सचा नवा 'अवतार'! १ एप्रिलपासून प्राप्तिकर कायदा बदलणार; तुमच्या कमाईवर कसा परिणाम होणार?
वरील तक्त्यावरून स्पष्ट होते की, केवळ ०.५५ टक्क्यांच्या फरकामुळे तुम्हाला २० वर्षांत तब्बल २.४४ लाख रुपये अतिरिक्त मोजावे लागू शकतात. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी खालील गोष्टी नक्की तपासा.

  • प्रोसेसिंग फी: अनेकदा कमी व्याजदर असलेल्या बँका प्रोसेसिंग फी जास्त आकारतात.
  • प्रिपमेंट चार्जेस: कर्ज मुदतीपूर्वी फेडल्यास बँक दंड आकारते का, याची खात्री करा.
  • सिबिल स्कोर: तुमचा सिबिल स्कोर ७५० च्या वर असल्यास तुम्ही बँकांशी व्याजदर कमी करण्यासाठी वाटाघाटी करू शकता.

Web Title : आईसीआईसीआई या एक्सिस बैंक: कौन सा होम लोन अधिक फायदेमंद है?

Web Summary : होम लोन के लिए आईसीआईसीआई और एक्सिस बैंक में से किसे चुनें? आईसीआईसीआई कम ब्याज दर प्रदान करता है, जिससे 20 वर्षों में लाखों की बचत हो सकती है। सर्वोत्तम सौदे के लिए शुल्क की तुलना करें और अपने क्रेडिट स्कोर के आधार पर बातचीत करें।

Web Title : ICICI or Axis Bank: Which home loan is more beneficial?

Web Summary : Choosing between ICICI and Axis Bank for a home loan? ICICI offers lower interest rates, potentially saving lakhs over 20 years. Compare fees and negotiate based on your credit score for the best deal.