Lokmat Money >बँकिंग > RBI Repo Rate: किती कमी होऊ शकतो तुमचा EMI? होम लोन घेणाऱ्यांना रिझर्व्ह बँकेकडून मोठं गिफ्ट, रेपो दरात कपात

RBI Repo Rate: किती कमी होऊ शकतो तुमचा EMI? होम लोन घेणाऱ्यांना रिझर्व्ह बँकेकडून मोठं गिफ्ट, रेपो दरात कपात

RBI Repo Rate Cut Home Loan EMI: जर तुम्हीही गृहकर्ज घेतलं असेल किंवा ते घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी दिलासा देणारी ठरणारे. आता तुमच्या ईएमआयचा भार काहीसा कमी होऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 11:01 IST2025-04-09T10:59:19+5:302025-04-09T11:01:37+5:30

RBI Repo Rate Cut Home Loan EMI: जर तुम्हीही गृहकर्ज घेतलं असेल किंवा ते घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी दिलासा देणारी ठरणारे. आता तुमच्या ईएमआयचा भार काहीसा कमी होऊ शकतो.

How much your EMI will reduce rbi monetary policy repo rate cut governor sanjay malhotra | RBI Repo Rate: किती कमी होऊ शकतो तुमचा EMI? होम लोन घेणाऱ्यांना रिझर्व्ह बँकेकडून मोठं गिफ्ट, रेपो दरात कपात

RBI Repo Rate: किती कमी होऊ शकतो तुमचा EMI? होम लोन घेणाऱ्यांना रिझर्व्ह बँकेकडून मोठं गिफ्ट, रेपो दरात कपात

RBI Monetary Policy Home Loan EMI: जर तुम्हीही गृहकर्ज घेतलं असेल किंवा ते घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी दिलासा देणारी ठरणारे. होय, देशातील कोट्यवधी लोकांना आरबीआयकडून मोठं गिफ्ट देण्यात आलंय. फेब्रुवारीमध्ये पॉलिसी रेटमध्ये २५ बेसिस पॉईंट्सची कपात केल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं पुन्हा व्याजदरात कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने (एमपीसी) बुधवारी व्याजदरात २५ बेसिस पॉईंटची कपात जाहीर केली. या कपातीनंतर रेपो दर ६ टक्क्यांवर आला. फेब्रुवारीमध्ये तो २५ बेसिस पॉईंटच्या कपातीनंतर रेपो दर ६.५ टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर आला होता. व्याजदरात कपात केल्यानं गृहकर्जाच्या ईएमआयवरही परिणाम होणार आहे.

सर्वसामान्यांना दिलासा

रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची ही दुसरी पतधोरण समितीची बैठक होती. पहिल्या पतधोरण समितीच्या बैठकीत त्यांच्या अध्यक्षतेखाली रेपो दरात २५ बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली होती. यावेळी सलग दुसऱ्यांदा त्यांनी सर्वांना मोठा दिलासा दिला आहे. गेल्या पाच वर्षांत दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केली आहे. आरबीआयनं दोन वेळा मिळून व्याजदरात ५० बेसिस पॉईंट्सची कपात केली. रेपो दरात कपात केल्यानंतर बँका गृहकर्जासह विविध प्रकारच्या व्याजदरात कपात करू शकतात, अशी अपेक्षा आहे.

ट्रम्प टॅरिफच्या धक्क्यादरम्यान RBI चा सामान्यांना दिलासा, पुन्हा EMI होणार कमी; रेपो दरात कपात

ईएमआय कपातीचा थेट फायदा!

रेपो दरात कपातीचा परिणाम असा होणार आहे की, व्याजदर आणि ईएमआय कपातीचा थेट फायदा बँक ग्राहकांना होणार आहे. रेपो दरात पुन्हा २५ बेसिस पॉईंटची कपात केल्यानं रेपो रेट ६ टक्क्यांवर आला आहे. यानंतर बँकांना गृहकर्जाच्या दरातही २५ बेसिस पॉईंटची कपात करू शकतात. उदाहरणार्थ, जर तुमचा गृहकर्जाचा व्याजदर ८.५ टक्के असेल तर तो ८.२५ टक्क्यांवर येईल. अशा परिस्थितीत तुमचा ईएमआय किती कमी होईल? या संदर्भात आपण ३० लाख आणि ५० लाख रुपयांच्या गृहकर्जाचा हिशोब समजून घेऊ. कर्जाच्या परतफेडीचे हे गणित २० वर्षांच्या आधारावर केलं जाणार आहे. २० वर्षांच्या गृहकर्जावर तुमचा ईएमआय किती कमी होईल ते पाहूया.

३० लाखांच्या कर्जावर काय फायदा?

जर तुम्ही ३० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतलं असेल आणि त्याचा व्याजदर ८.५ टक्के असेल तर तुमचा ईएमआय २६,०३५ रुपये असेल. पण हा व्याजदर २५ बेसिस पॉईंटनं कमी केल्यास तो ८.२५ टक्क्यांवर येईल. यामध्ये तुम्हाला दरमहा २५,५६२ रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील. अशा प्रकारे तुम्हाला एका महिन्यात ४७३ रुपये कमी मोजावे लागतील. अशा प्रकारे तुम्हाला वर्षभरात ५,६७६ रुपयांचा फायदा मिळेल.

५० लाखांवर किती फायदा?

जर कर्जाची रक्कम ५० लाख रुपयांपर्यंत वाढली आणि त्याचा व्याजदर ८.५ टक्के असेल तर तुम्हाला ४३,३९१ रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. पण जर हा व्याजदर २५ बेसिस पॉईंटने कमी करून ८.२५ टक्के करण्यात आला तर तुम्हाला दरमहा ४२,६०३ रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अशा प्रकारे एका महिन्याच्या ईएमआयमध्ये तुमची ७८८ रुपयांची बचत होईल. जर वार्षिक बचत पाहिली तर ती ९,४५६ रुपये होईल.

रेपो दर म्हणजे काय?

आरबीआयकडून ज्या दराने बँकांना कर्ज दिलं जातं त्याला रेपो रेट म्हणतात. रेपो दरात वाढ केल्यास बँकांना आरबीआयकडून अधिक दरानं कर्ज मिळतं. यामुळे होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन आदींच्या व्याजदरात वाढ होते, ज्याचा थेट परिणाम तुमच्या ईएमआयवर होतो. जर रेपो दरात कपात झाली तर बँकाही आपला कर्जाचा व्याजदर कमी करुन ग्राहकांना दिलासा देऊ शकतात.

Web Title: How much your EMI will reduce rbi monetary policy repo rate cut governor sanjay malhotra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.