Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >बँकिंग > ₹८० लाखांचं घर खरेदी करायचंय, २० लाखांचं डाऊनपेमेंट द्यायचंय; उरलेल्या रकमेवर किती लागेल लोनचा EMI

₹८० लाखांचं घर खरेदी करायचंय, २० लाखांचं डाऊनपेमेंट द्यायचंय; उरलेल्या रकमेवर किती लागेल लोनचा EMI

Home Loan Calculation: ८० लाख रुपयांचे घर खरेदी करणं हा अनेकांसाठी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही २० लाख रुपयांचं डाउन पेमेंट केलं, तर उर्वरित ६० लाख रुपयांसाठी तुम्हाला होमलोन घ्यावं लागतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 11:23 IST2026-03-24T11:21:14+5:302026-03-24T11:23:13+5:30

Home Loan Calculation: ८० लाख रुपयांचे घर खरेदी करणं हा अनेकांसाठी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही २० लाख रुपयांचं डाउन पेमेंट केलं, तर उर्वरित ६० लाख रुपयांसाठी तुम्हाला होमलोन घ्यावं लागतं.

Home Loan Want to buy a house worth rs 80 lakhs want to give a down payment of rs 20 lakhs How much will be the loan EMI on the remaining amount | ₹८० लाखांचं घर खरेदी करायचंय, २० लाखांचं डाऊनपेमेंट द्यायचंय; उरलेल्या रकमेवर किती लागेल लोनचा EMI

₹८० लाखांचं घर खरेदी करायचंय, २० लाखांचं डाऊनपेमेंट द्यायचंय; उरलेल्या रकमेवर किती लागेल लोनचा EMI

Home Loan Calculation: ८० लाख रुपयांचे घर खरेदी करणं हा अनेकांसाठी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही २० लाख रुपयांचं डाउन पेमेंट केलं, तर उर्वरित ६० लाख रुपयांसाठी तुम्हाला होमलोन घ्यावं लागतं. आता सर्वात मोठा प्रश्न हा असतो की, या कर्जावर दरमहा किती EMI द्यावा लागेल आणि तो तुमच्या उत्पन्नानुसार योग्य असेल की नाही. 

व्याजाचा दर, कर्जाचा कालावधी आणि बँकेच्या अटींनुसार तुमचा EMI ठरवला जातो. ६० लाख रुपयांच्या होम लोनवर तुमचा मासिक हप्ता किती असू शकतो आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, हे आपण येथे समजून घेऊया.

सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; ऑल टाईम हाय वरुन ४२,९६८ रुपयांनी घसरलं सोनं, २,१७,००० रुपयांवर चांदी

२० वर्षांच्या कालावधीसाठी ६० लाख रुपयांच्या होम लोनचा EMI

तुम्ही जे होम लोन घेत आहात, ते सर्वात स्वस्त दरात मिळेल याचा प्रयत्न करा. होम लोनचा दर हा तुमचा सिबिल स्कोअर, उत्पन्न, सध्या सुरू असलेले इतर कर्जाचे हप्ते आणि तुमचं वय यावर अवलंबून असतो. ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोअर ८०० किंवा त्यापेक्षा जास्त असतो, त्यांना बँका सहजपणे स्वस्त दरात कर्ज देतात. मात्र, अंतिम निर्णय बँकेचा असतो. 

जर तुम्ही एखाद्या बँकेकडून ६० लाख रुपयांचे होम लोन घेतलं आणि त्याचा सुरुवातीचा व्याजदर सध्या ७.५० टक्के असेल, तर कॅल्क्युलेशननुसार २० वर्षांसाठी ६० लाख रुपयांच्या कर्जाचा EMI ४८,३३६ रुपये होईल. या कालावधीत तुम्हाला फक्त व्याजापोटी ५६,००,५४२ रुपये भरावे लागतील.

१५ वर्षांच्या कालावधीसाठी EMI किती?

जर तुम्ही ७.५० टक्के व्याजदरानं १५ वर्षांसाठी ६० लाख रुपयांचं होम लोन घेतलं, तर कॅल्क्युलेशननुसार तुमचा मासिक EMI ५५,६२१ रुपये असेल. या कालावधीत तुम्हाला व्याजापोटी ४०,११,७३३ रुपये द्यावे लागतील. येथे एक गोष्ट लक्षात घ्या की, कर्ज परतफेडीचा कालावधी जितका कमी असेल, तितकं व्याज तुम्हाला कमी द्यावं लागेल. यामध्ये तुमचा EMI थोडा जास्त असेल, पण शेवटी ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. याउलट, कर्जाचा कालावधी जितका मोठा असेल, तितकं जास्त व्याज तुम्हाला भरावं लागेल. अशा वेळी मासिक EMI कमी असेल, पण दीर्घकाळात हे कर्ज तुम्हाला महाग पडेल. होम लोन तुम्ही ३० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी सुद्धा घेऊ शकता.

आपल्या बजेटपेक्षा जास्त होम लोन घेऊ नका

तज्ज्ञांच्या मते, आपल्या बजेटनुसारच होम लोन घेतलं पाहिजे. एका ठराविक मासिक उत्पन्नामध्ये EMI व्यतिरिक्त घराचा खर्च, मुलांची शाळेची फी, वैद्यकीय खर्च आणि इतर जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच होम लोनची रक्कम ठरवली पाहिजे. बँक तुमच्या उत्पन्नानुसार तुम्हाला जास्तीत जास्त किती कर्ज मिळू शकते हे ठरवते, त्यापेक्षा जास्त कर्ज तुम्हाला मिळू शकत नाही. त्यामुळे, कमीत कमी होम लोन घेण्याचा प्रयत्न असावा.

Web Title : होम लोन ईएमआई कैलकुलेशन: ₹80 लाख का घर खरीदना?

Web Summary : घर खरीदने की योजना है? लोन राशि, ब्याज दर और अवधि के आधार पर अपनी होम लोन ईएमआई की गणना करें। मासिक किस्तों और कुल देय ब्याज पर डाउन पेमेंट और लोन अवधि के प्रभाव को समझें ताकि वित्तीय निर्णय ले सकें।

Web Title : Home Loan EMI Calculation: Affording a ₹80 Lakh Dream House?

Web Summary : Planning to buy a home? Calculate your home loan EMI based on loan amount, interest rate, and tenure. Understand the impact of down payment and loan period on monthly installments and overall interest payable to make informed financial decisions.