Home Loan Interest Rates : देशातील मालमत्तांचे दर दररोज गगनाला भिडत आहेत. स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी घरांच्या वाढत्या किमती मोठे आव्हान ठरत आहेत. विशेषतः देशातील टियर-१ आणि टियर-२ शहरांमध्ये तर घरांच्या किमती कोट्यवधींच्या घरात पोहोचल्या आहेत. यामुळे, घर खरेदी करण्यासाठी बहुतांश लोक बँक कर्जाचा आधार घेतात. परंतु, प्रत्येक बँक वेगवेगळ्या व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध करते. जर तुम्ही कर्ज घेऊन घर घेण्याचा विचार करत असाल, तर आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तुम्ही सर्व प्रमुख बँकांचे व्याजदर तपासणे महत्त्वाचे आहे.
सरकारी बँकांचे गृहकर्ज व्याजदर
| बँकेचे नाव | गृहकर्जाचा व्याजदर (टक्के) |
| सेंट्रल बँक ऑफ इंडिया | ७.३५% |
| बँक ऑफ इंडिया | ७.३५% |
| कॅनरा बँक | ७.४०% |
| पंजाब नॅशनल बँक | ७.४५% |
| बँक ऑफ बडोदा | ७.४५% |
| युनियन बँक ऑफ इंडिया | ७.४५% |
| भारतीय स्टेट बँक | ७.५०% |
या यादीनुसार, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया सर्वात कमी ७.३५% दरात गृहकर्ज देत आहेत.
खासगी बँकांचे गृहकर्ज व्याजदर
| बँकेचे नाव | गृहकर्जाचा व्याजदर (टक्के) |
| आयडीबीआय बँक | ७.५५% |
| आयसीआयसीआय बँक | ७.७०% |
| एचडीएफसी बँक | ७.९०% |
| ॲक्सिस बँक | ८.३५% |
| येस बँक | ९.००% |
खासगी बँकांमध्ये आयडीबीआय बँक (७.५५%) आणि आयसीआयसीआय बँक (७.७०%) तुलनेने कमी दरात कर्ज उपलब्ध करत आहेत.
वाचा - ५ लाख रुपयांचे मिळतील १० लाख! पोस्ट ऑफिसची 'ही' सरकारी योजना १००% सुरक्षित, काय आहेत फायदे?
कर्ज घेण्यापूर्वी काय तपासावे?
- केवळ व्याजदरच नाही, तर कर्ज घेताना लागणारी प्रोसेसिंग फी आणि इतर छुपे शुल्क देखील तपासा.
- तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास बँक तुम्हाला घोषित केलेल्या दरांपेक्षा कमी दरातही कर्ज देऊ शकते.
- गृहकर्ज घेण्याचा निर्णय तुमच्या आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे वेगवेगळ्या बँकांच्या दरांची तुलना करूनच योग्य बँकेची निवड करा.
