Anil Ambani Stocks High: अनिल अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी प्रचंड वाढ झाली आहे. गुरुवारी बीएसईवर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स ५% वाढून १६६.९५ रुपयांवर पोहोचले. बुधवारीही कंपनीचे शेअर्स ५% च्या अपर सर्किटसह १५९ रुपयांवर बंद झाले होते. याआधी, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स सलग ६ दिवस घसरले होते. मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी कंपनीचे शेअर्स १४९.८५ रुपयांच्या नवीन ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले होते. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ४२५ रुपये आहे.
सहा महिन्यांत ४५% पेक्षा अधिक घसरण
अनिल अंबानी यांच्या समूहाच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स गेल्या सहा महिन्यांत ४५% पेक्षा जास्त घसरले आहेत. २७ मे २०२५ रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स ₹३०६.८५ वर होते. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स ₹१६६.९५ वर आले. गेल्या महिन्यात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स २५% पेक्षा जास्त घसरले. या वर्षी आतापर्यंत अनिल अंबानींच्या मालकीच्या कंपनीचं ४७% पेक्षा जास्त नुकसान झालंय. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून ६०% पेक्षा जास्त घसरलेत.
रिलायन्स पॉवरमध्येही तेजी
अनिल अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्येही सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली. गुरुवारी रिलायन्स पॉवरचे शेअर्स ३% वाढून ४०.७९ रुपयांवर पोहोचले. बुधवारी बीएसईवर रिलायन्स पॉवरचे शेअर्स ५% पेक्षा जास्त वाढीसह ३९.४७ रुपयांवर बंद झाले. गेल्या सहा महिन्यांत अनिल अंबानींच्या पॉवर कंपनीचे शेअर्स २०% पेक्षा जास्त घसरले आहेत. गेल्या एका महिन्यात कंपनीचे शेअर्स सुमारे ९% घसरलेत. रिलायन्स पॉवरच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ७६.४९ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३१.३० रुपये आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
